जागर न्यूज : बलात्कार केल्याचे प्रकरण मिटविण्यासाठी होत असलेल्या पैशाच्या मागणीला कंटाळून आणि खोटा गुन्हा दाखल करण्याच्या धमकीला वैतागून पंढरपूर येथील एका तरुणाने आत्महत्या केल्याची मोठी घटना उघडकीस आली आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.
पंढरपूर येथील ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली सोपान हजारे या तरुणावर बलात्काराची केस दाखल करण्यात आली असून त्याला या प्रकरणी अटक देखील झाली होती. त्यानंतर हे प्रकरण संपले नाही तर उलट वाढत गेले. बलात्काराची केस दाखल करूनही ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली सोपान हजारे याचा मानसिक छळ सुरुच राहिला आणि त्याचा शेवट आत्महत्येत झाला. बलात्काराची केस मिटवून घेण्यासाठी एक महिला व पुरुष या दोघांनी राहत असलेल्या घराचा अर्धा हिस्सा व १० लाख रुपयांची मागणी केल्यामुळे तरुणाने राहत्या घरात ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली सोपान हजारे यांचे एका महिलेबरोबर मागील दहा वर्षांपासून संबंध होते. त्या महिलेने तक्रार दिल्याने ज्ञानेश्वरवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. दरम्यान ज्ञानेश्वर हा जामिनावर सुटून आला होता. त्यानंतरही त्या दोघांमध्ये संबंध सुरूच होते. त्यानंतर ती महिला ज्ञानेश्वर यांच्याकडे गुन्हा मागे घेण्यासाठी सतत पैसे मागत होती. पैसे नाही दिले तर पुन्हा खोटा गुन्हा दाखल करून कारागृहात पाठवीन, अशी धमकी देत होती. तसेच ज्ञानेश्वर यांच्या पत्नीबरोबरही भांडण करत होती.
मागील दोन महिन्यांपासून आणखी एका पुरुषाबरोबर त्या महिलेचे संबंध जुळले. ते दोघे मिळून ज्ञानेश्वर यांना तू पैसे दे, नाही तर तुझ्याविरुद्ध गुन्हा दाखल करीन अशी धमकी दिली, याबाबत ज्ञानेश्वर यांनी स्वतःच्या आईला व घरातील लोकांना सांगितले. या सर्व प्रकाराला तो कंटाळून गेला होता आणि मानसिक दृष्ट्या देखील खचून गेला होता. या प्रकरणातून बाहेर पडण्याचा मार्ग तो शोधत होता. एकूण प्रकरणाने त्याची झोप उडाली होती आणि आत्महत्या केल्याच्या आदल्या रात्री तो रात्रभर झोपला नव्हता. (Young man commits suicide due to harassment of woman) अखेर त्याने आपल्या राहत्या घरातच आपले आयुष्य संपवले. बलात्काराची केस मिटवून घेण्यासाठी पैशाच्या मागणीवरून टमदाटी व मारहाण करून व दिलेल्या मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळून त्याने आत्महत्या केली. याप्रकरणी संबंधित महिला आणि तिच्याशी संबंध असलेल्या एका पुरुषाच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा