जागर न्यूज : पावसाळा कमी झाल्याने उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरले नाही त्यामुळे येत्या काही महिन्यातच उजनी धरण मायनस पातळी गाठणार आहे त्यामुळे उन्हाळ्यातील टंचाईचे संकेत आत्ताच मिळू लागले आहेत.
उजनी धरण यंदा फेब्रुवारीअखेरीस उणे जाईल. त्यानंतर सोलापूर शहरासाठी तीनवेळा भीमा नदीतून पाणी सोडावे लागेल. एमआयडीसींसह बॅक वॉटरच्या पाणी पुरवठा योजना, बाष्पीभवन, यामुळे यंदा धरण उणे ५९ ते ७० टक्क्यांपर्यंत खाली जाईल, अशी स्थिती आहे. ज्यावेळी उजनी उणे ५५ टक्के होईल, तेव्हा पाईपलाईनमधून पाणी जात नाही. त्यावेळी पाणीपुरवठ्याचे दिवस पुन्हा वाढतील. चिंतेची बाब म्हणजे धरण उणे ७० टक्के झाल्यानंतर नदीतूनही पाणी सोडता येत नाही. यंदा तशी स्थिती निर्माण होईल एवढा सध्या पाणीसाठा उजनीत आहे.
सोलापूर, पुणे व नगर या तीन जिल्ह्यांसह १००हून अधिक ग्रामपंचायती, पाच-सहा नगरपरिषदा, कर्जत-जामखेड, धाराशिव, इंदापूर, बारामती या शहरांना उजनीचाच आधार आहे. पण, यंदा पाऊस कमी झाल्याने सध्या उजनीत ५७ टक्केच उपयुक्त पाणीसाठा आहे. १ नोव्हेंबरपासून शेतीला पहिले तर जानेवारीअखेरीस दुसरे आवर्तन सोडले जाणार आहे. त्यानंतर सोलापूर शहरासाठी भीमा नदीतून पाणी सोडले जाईल. त्यामुळे फेब्रुवारीअखेर धरण उणे होईल, अशी वस्तुस्थिती आहे..
गतवर्षी अलनिनो चक्रीवादळामुळे पावसाचा अंदाज हुकला आणि यंदाच्या पावसाळ्यातही त्याचा परिणाम जणावला. (Ujani dam will soon go to minus level) आता पुढच्या वर्षी ‘सुपर अलनिनो’ चक्री वादळाची शक्यता वर्तविली जात असल्याने पावसाळा लांबणीवर पडेल अशी भीती आहे. त्यामुळे धरणातील पाणी जपूनच वापरावे लागणार असल्याचे अधिकाऱ्यांचे मत आहे.
आता १ नोव्हेंबरपासून शेतीला पाणी सोडताना पहिल्या आवर्तनासाठी अंदाजे ९ टीएमसी पाणी लागणार आहे. जानेवारीतील आवर्तनासाठी अंदाजे आठ टीएमसी पाणी लागेल. त्यानंतर भीमा नदीतून सोलापूर शहरासाठी पाणी (७ टीएमसी) सोडल्यावर फेब्रुवारीअखेरीस उजनी धरण उणे झालेले असणार, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.पहिल्या आवर्तनानंतर एक महिन्याच्या अंतराने शेतीसाठी दुसरे आवर्तन सोडले जाणार आहे. कारण, सोलापूर शहराला पाणी सोडल्यानंतर लेव्हल खाली जावून कॅनॉलमधून पाणी सोडणे कठीण होईल. जिल्ह्यात सध्या आठ टॅंकर सुरु आहेत, फेब्रुवारी ते १५ जूनपर्यंत ही संख्या १००वर पोचेल, अशी सद्य:स्थिती आहे.
१ नोव्हेंबरपासून सलग ४० दिवस कालवा व उपसा सिंचन योजनांमधून शेतीसाठी पाणी सुटणार असून, २० जानेवारीपासून शेतीसाठी सोडले जाणार पुन्हा पाणी सोडले जाणार आहे, साधारणत: २० दिवसांचा हा कालावधी असाणार आहे जानेवारीतच सोलापूर शहरासाठी भीमा नदीतून पाणी सोडले जाणार असून, त्यानंतर प्रत्येक दोन महिन्यातून एकदा पाणी सोडले जाईल. बाष्पीभवनातून आठ ते नऊ टीएमसी पाणी जाण्याची शक्यता असून सध्या उजनीत एकूण पाणीसाठा ९४ टीएमसी आहे, पण त्यात ३०.७० टीएमसीच उपयुक्त साठा आहे. भविष्यातील टंचाईचे संकट आत्ताक संकेत देत असून पाण्याचा काटकसरीने वापर करणे अनिवार्य ठरणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा