जागर न्यूज : आपण राज्याचे मुख्यमंत्री असताना पक्षातील लोकांनीच कारस्थान करून आपल्याला मुख्यमंत्री पदावरून हटविले असा गौप्यस्फोट करून काँग्रेसचे जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी स्वपक्षीयांनाच 'घरचा आहेर' दिला आहे.
देशात काँग्रेस पक्षाची अवस्था अत्यंत बिकट झाली असताना काँग्रेसचे एकनिष्ठ आणि वरिष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी काँग्रेस पक्षातील नेत्यावरच सडकून प्रहार केला आहे. काँग्रेस पक्षातील अंतर्गत कट कारस्थानाचा पाढा त्यांनी जाहीरपणे वाचला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. "पक्षातील लोकांनी कारस्थान करुन मला मुख्यमंत्री पदावरुन हटवलं. मात्र तेव्हापासून आजपर्यंत त्यांना पराभव पत्करावा लागला आहे", असा आरोप सुशीलकुमार शिंदे यांनी केला आहे. "मुख्यमंत्रीपदावरून हटवलं आणि राज्यपाल म्हणून आंध्रप्रदेशला पाठवलं, मला कसं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावरुन काढलं, यावेळी काय कारस्थान झालं हे सगळे काही मला माहित असून ते मी विसरू शकत नाही", असंही सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटले आहे.
सुशीलकुमार शिंदे यांनी स्वपक्षालाच घरचा आहेर दिला आहे. पक्षातील लोकांनीच मला कारस्थान करून मुख्यमंत्री पदावरू हटवलं आणि आंध्र प्रदेशात राज्यपाल म्हणून पाठवले, पण ठीक आहे. मी त्यानंतर दिल्लीच्या मंत्रिमंडळात गेलो. मात्र, त्यांना जो पराभव पत्करावा लागला तो अजूनपर्यंत आहे, असे सांगत त्यांनी ही घटना आपल्या जिव्हारी लागली असल्याचेच दाखवून दिले. सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना गुजराती समाजाला दोन टक्के आरक्षण देण्यात आलं. या आरक्षणाबाबत आता सुशीलकुमार शिंदे यांनी मोठा खुलासा केला आहे. गुजराती समाजाला आरक्षण दिले कारण माझा जावईही गुजराती होता. त्यामुळे मला ते करावं लागलं, असा गौप्यस्फोट देखील शिंदे यांनी सोलापुरात केला आहे.
सुशीलकुमार शिंदे म्हणाले, की 'मी मुख्यमंत्री असताना गुजराती समाजाला दोन टक्के आरक्षण दिले होते. तेवढे एक चांगले काम मी केले होते. पण सुशीलकुमारांनी ते चांगले काम केलं हे देखील लोक आता विसरून गेलेलं आहेत. जावयाला सांभाळायचं म्हटल्यावर हे सगळं करावं लागतं', अशी पुष्टी त्यांनी जोडली आणि समोरून हशा पिकला. हे सगळे केल्यामुळे मी तिथे पुन्हा निवडून आलो. ही साधी गोष्ट नव्हती असेही यावेळी बोलताना शिंदे म्हणाले. काहीही झालं तरी आपण प्रामाणिकपणे आपलं काम करत राहिलं पाहिजे असं मला वाटतं असं देखील त्यांनी सांगिलते.
सोलापुरातील एका पुरस्कार सोहळ्या दरम्यान बोलताना सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्याच पक्षातील नेत्यांच्या बाबतीत मोठा आरोप केलाच पण घरचा आहेर देखील त्यांनी देऊन टाकला. (Sushilkumar Shinde alleges against Congress leaders) याची चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागलाय असून जावयासाठी दिलेल्या आरक्षणाबाबत देखील वेगळ्या चर्चेला उधाण आलेले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा