हे नवे वर्ष आमच्या वाचक, जाहिरातदार आणि हितचिंतक यांना आनंद आणि आरोग्याचे जावे हीच शुभकामना ! - अनिल सोनवणे, संपादक : जागर न्यूज मराठी
मुंबई : पंधरा ते अठरा वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी आजपासू नोंदणी सुरु झाली असून ३ जानेवारीपासून या मुलांना कोरोना प्रतिबंधात्मक लस दिली जाणार आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी नुकतेच देशाला संबोधित करताना लसीकरणासंदर्भात केलेल्या घोषणेत १५ ते १८ वयोगटामधील मुलांचे लसीकरण सुरु करण्यात येणार असल्याची एक घोषणा होती. त्यानुसार ३ जानेवारीपासून लहान मुलांचे लसीकरण करण्यात येणार आहे तसेच १० डिसेंबरपासून आरोग्य कर्मचारी आणि ६० वर्षांवरील नागरिकांसाठी बूस्टर डोस देखील सुरु करण्यात येणार आहे. मुलांसाठी करण्यात येणाऱ्या लसीकरणासाठी आजपासून नोंदणी सुरु झाली आहे Cowin अॅपवर रजिस्ट्रेशन खुले असून परवापासून मुलांचे लसीकरण सुरु होत आहे.
१ जानेवारीपासून १५-१८ वयोगटामधील मुलांच्या लसीकरणासाठी नोंदणी करु शकता अशी माहिती CoWIN प्लॅटफॉर्मचे प्रमुख डॉ आर एस शर्मा यांनी दिली होती. मिळालेल्या माहितीनुसार, १५ ते १८ वयोगटातील मुले १ जानेवारीपासून पोर्टलवर नोंदणीकरिता पात्र असणार आहेत. यासाठी पोर्टलमध्ये नोंदणीवेळी ओळखपत्राकरिता १० वीचं विद्यार्थी ओळखपत्र सादर करता येणार आहे. काही विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड अथवा इतर ओळखपत्र नसण्याची शक्यता असल्यामुळे त्यांच्यासाठी ही सुविधा देण्यात आली आहे.
नोंदणी करण्याची पद्धत
पहिले Covin App वर जा, तेथे तुमचा मोबाइल क्रमांक टाका. त्यानंतर मोबाईलवर ओटीपी येईल आणि तो टाकून लॉग इन करावे. नंतर आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, पासपोर्ट, पेन्शन पासबुक, एनपीआर स्मार्ट कार्ड, व्होटर आयडी, युनिक डिसॅबिलिटी आयडी किंवा रेशन कार्ड यापैकी कोणताही एक फोटो आयडी पुरावा म्हणून निवडा. तुम्ही निवडलेल्या पर्यायाचा आयडी नंबर आणि नाव टाका. त्यानंतर लिंग आणि जन्म तारीख निवडा. सदस्य जोडल्यानंतर, तुम्ही तुमच्या जवळच्या क्षेत्राचा पिन कोड टाका. त्यानंतर लसीकरण केंद्रांची यादी येईल. या रजिस्ट्रेशन प्रक्रियेकरिता या पोर्टलवर आणखी एक स्लॉट जोडण्यात आला आहे. तिथून मुलांना लसीकरणाकरिता स्लॉट बुक करता येणार आहे.
येत्या ३ जानेवारीपासून लहान मुलांच्या लसीकरणाला सुरुवात करण्यात येणार आहे. याकरिता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून गाईडलाईन्स जारी करण्यात आले आहेत. लहान मुलांना लस देण्यासाठीची सीरींज, नीडल कदाचित वेगळी असणार आहे. तिसऱ्या लाटेला सुरुवात झाली असून लसीकरण हे अत्यंत आवश्यक झाले आहे. पंधरा ते अठरा वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण करून घेण्याचे आवाहनही करण्यात येत आहे.
वाचा : >> सोलापूर जिल्ह्यात कोरोनाची सर्वाधिक वाढ !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा