पंढरपूर : शासनमान्य 'पत्रकार संरक्षण समिती' च्या नूतन कार्यकारिणीची बैठक होऊन या बैठकीत नवी कार्यकारिणी निवडण्यात आली आहे.
शासनमान्य पत्रकार संरक्षण समिती, महाराष्ट्र राज्य या संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. अध्यक्षस्थानी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष भगवान वानखेडे होते. या सर्वसाधारण सभेत पंढरपूर शहर आणि तालुक्यासाठीच्या नव्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली तसेच संघटनेच्या सल्लागारपदी जेष्ठ पत्रकार आणि 'डिजिटल मिडिया संपादक, पत्रकार संघटना महाराष्ट्र' चे राज्य समिती सदस्य अशोक गोडगे यांची निवड करण्यात आली.
संघटनेच्या अध्यक्षपदी अध्यक्षपदी तानाजी जाधव, कार्याध्यक्षपदी संतोष कांबळे तसेच उपाध्यक्षपदी लक्ष्मण जाधव, सचिवपदी अशोक पवार, सहसचिवपदी तानाजी सुतकर, खजिनदारपदी सचिन दळवे, प्रसिद्धी प्रमुखपदी लिंगेश भुसनर इत्यादींची निवड करण्यात आली. तसेच पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष भगवान वानखेडे, शंकरराव पवार, उमेश टोमके यांचे शुभहस्ते सर्व नुतन पदाधिकार्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी जेष्ठ पत्रकार नंदकुमार देशपांडे, डॉ. राजेश फडे, अनिल सोनवणे, शंकरराव कदम, गौतम जाधव, विजयकुमार गायकवाड, डॉ.शिवाजी पाटोळे, नामदेव लकडे, जैनुद्दीन मुलाणी, लखन साळुंखे, धीरज साळुंखे, बाळासाहेब सावंत, शरद कारटकर, आनंद भोसले, संजय हेगडे, मुकूंद माने-देशमुख, सुदर्शन खंदारे, भारत शिंदे, स्वप्नील जाधव, गणेश देशमुख आदी पत्रकार सदस्य उपस्थित होते.
वाचा > क्लिक करा >> पंढरीत मुलीला धक्का लागला म्हणून पेट्रोल टाकून जाळली दुचाकी !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा