जागर न्यूज : महाराष्ट्राला हादरवणारी एक घटना घडली असून चिमुकल्या मुलीसह माता पित्याचे मृतदेह फासावर लटकताना आढळून आले असून अत्यंत हृदयद्रावक आणि खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या आत्महत्या आहेत की घातपात आहे याबाबत तपास सुरु करण्यात आला आहे.
एकाच कुटुंबातील तीन जणांचा घरात दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. यामध्ये ४ वर्षीय चिमुकलीचाही समावेश आहे. ही धक्कादायक घटना सातारा पोलीस स्टेशन हद्दीत वळदगाव येथे आज उघडकीस आली आहे. घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातारा पोलीस स्टेशन हद्दीत वळदगांव येथे उपसरपंच संजय झळके यांच्या भाड्याने दिलेल्या खोलीमध्ये मोहन प्रताप डांगर (वय २८ वर्ष), पूजा मोहन डांगर (वय २४ वर्ष), श्रेया मोहन डांगर (वय ४ वर्ष) अशी मृत तिघांची नावे आहेत.
दरम्यान आज सकाळी छत्रपती संभाजीनगरमधील सातारा पोलीस ठाण्यात माहिती मिळाली की एकाच कुटुंबातील तीन जणांनी आत्महत्या केली आहे. त्यानंतर पोलीस निरीक्षक प्रशांत पोतदार हे कर्मचाऱ्यांसह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन तीनही मृतदेह तात्काळ घाटी रुग्णालयात हलवले. (Hanging bodies of parents with little girl) याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यामध्ये आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रशांत पोतदार करत आहेत.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. घटनेनंतर एक सहा सेकंदाचा व्हिडिओ समोर आला असून या व्हिडिओमध्ये तीन जण लटकलेल्या अवस्थेत दिसून येत आहेत. मात्र यामध्ये आत्महत्या केलेली महिला अर्धनग्न अवस्थेत दिसून येत आहे. त्यामुळे ही आत्महत्याच आहे की घातपात, असा संशय आता देखील वर्तवला जात आहे.दरम्यान, यातील मृत ४ वर्षांची मुलगी ही नियमित गावातच राहणाऱ्या आजीकडे जात होती. मात्र ती आज आली नसल्यामुळे आजी तिला बघण्यासाठी घरी आली असता ही धक्कादायक बाब उघडकीस आली.
वाळूज परिसरातील वळदगाव येथे एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार मोहन डांगर यांनी पत्नी आणि पाच वर्षांच्या मुलीची हत्या करुन स्वतः गळफास घेतला असल्याचं संशय आहे. मात्र पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. असे असलं तरीही मोहन यांनी एवढ्या टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण मात्र कळू शकले नाहीत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा