जागर न्यूज : फसवणूक करून बँकेतील खाते रिकामे करणाऱ्या अनेक टोळ्या कार्यरत आहेत पण बँकेकडूनच अशी फसवणूक झाल्याप्रकरणी एका खातेदाराने तक्रार केल्यानंतर नामांकित बँकेच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
पंढरपूर येथे पूर परिस्थिती ! !
लिंक पाठवून अथवा अन्य भूलथापा देवून बँकेतील खात्यावरील रक्कम गायब करण्याचे प्रकार काही नवे नाहीत. एका क्षणात लाखोंची रक्कम हडप केली जाते. सायबर पोलिसांकडे याचा गुन्हाही दाखल होतो. ग्राहकांचा प्रचंड विश्वास बँकेवर असतो पण बँकेनेच फसवणूक केल्याची तक्रार एका ग्राहकाने सायबर पोलिसात केली असून पहिल्यांदाच बँकेच्या विरोधात सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने बँकावरील विश्वास धोक्यात आला आहे. बँकेनेच खातेदाराची माहिती लिक केली असल्याचा मोठा आणि धक्कादायक आरोप विजयकुमार गोंविदराव ठुबे या जेष्ठ नागरिकाने केला आहे.
सदर प्रकार दोन दिवसांनी ठुबे यांच्या लक्षात आला. त्यांनी त्वरित बँकेत आणि सायबर पोलीस ठाण्यात तक्रार केली. सायबर पोलिसांनी ठुबे यांच्या तक्रारीनुसार अज्ञात मोबाइल धारक, फसवणुकीची रक्कम वर्ग झालेल्या खातेधारकाविरुद्ध आणि सदर बँकेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. खातेधाराकाने स्वतःची दिलेली वैयक्तिक माहिती गुप्त ठेवण्याची जबाबदरी बँकेची असते. मात्र बऱ्याच वेळा खातेधारकाची वैयक्तिक माहिती, त्याचा महिन्याचा खर्च, बँकेतील शिल्लक, सिव्हील स्कोर, त्याच्यावर असलेले लोन याची माहिती खाजगी बँकांना पुरविली जाते. याचा फायदा सायबर चोर घेत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. एखाद्या बँकेच्या विरोधात असा गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगण्यात येत आहे.
आपल्या बँकेच्या अकाउंट बद्दल कोणालाही माहिती शेअर करू नये. शक्य असल्यास बँकेची सर्व कामे बँकेत जाऊन करावी ऑनलाईन टाळावे बँकेच्या एपचा पासवर्ड नेहमी बदलत राहणे गरजेचे आहे. (Online fraud, first case filed against bank) अज्ञात नंबरवरून आलेल्या मेसेजला कोणताही प्रतिसाद देऊ नये. अज्ञात नंबरवरून आलेली लिंक खात्री झाल्याशिवाय ओपन करू नये.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा