जागर न्यूज : ठाण्याच्या रुग्णालयात मृत्यूचे तांडव घडत असतानाच आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला असून लसीकरण झाल्यानंतर तब्बल पाच महिने इंजेक्शनच सुई चिमुकलीच्या मांडीतच असल्याचे उघडकीस आले आहे.
अंबरनाथ मध्ये राहणारे विशाल बनसोडे यांनी मुलगी अद्विकाचं नवव्या महिन्यातील लसीकरण करण्यात आले. बदलापूरच्या दुबे रुग्णालयात बनसोडे यांनी मुलगी अद्विका हिला लस दिली. लसीकरण झाल्यानंतर काही दिवस तिच्या मांडीवर सूज होती. सूज उतरल्यानंतर पुढील पाच महिने अद्विकाला कोणताही त्रास झाला नाही. मात्र, काही दिवसांपूर्वी ती सतत मांडी खाजवत असल्याचं बनसोडे दांपत्याच्या लक्षात आलं. मुलीला त्रास होत असल्याने त्यांनी तिला अंबरनाथच्या आशीर्वाद रुग्णालयात नेले. आशीर्वाद रुग्णालयात अद्विकाच्या विविध चाचण्या करण्यात आल्या. रुग्णालयातील डॉक्टर मनोज कंदोई यांनी तिच्या मांडीचा एक्क्सरे केल्यानंतर मांडीत इंजेक्शनची सुई असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यानंतर तिचं ऑपरेशन करून मांडीतील सुई काढण्यात आली. ऑपरेशन केल्यानंतर अद्विकाच्या मांडीवर तीन टाके पडलेत. अद्विकाच्या मांडीतली सुई काढण्यात आली आहे.
तब्बल पाच महिने इंजेक्शनची सुई अद्विकाच्या मांडीत होती. आता ऑपरेशन झाल्यानंतर तिला कोणताही धोका नसला तरी, या गंभीर प्रकाराची दखल घेऊन दुबे रुग्णालयातील संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी बनसोडे दांपत्यानं केली आहे. (The injection needle remains in the thigh for five months) तर या प्रकरणाची चौकशी केली जाईल जर कोणी दोषी आढळला तर त्याच्यावर निश्चितच कारवाई केली जाईल असं दुबे रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेश अंकुश यांनी सांगितले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा