जागर न्यूज : 'गॅस संपला की मागवा सिलेंडर' असे आता चालणार नसून ग्राहकाला आता वर्षभरात फक्त १५ सिलेंडर दिले जाणार आहेत त्यामुळे गॅस आता जपूनच वापरावा लागणार आहे.
गॅस सिलेंडर एकीकडे अधिकाधिक महाग होत चालला असून वाढत्या दरामुळे सामान्य ग्राहकांचे कंबरडे मोडून आर्थिक गणिते कोलमडून पडू लागली आहेत. त्यात एकेक जाचक अटी आणि नियम विळखा घालत असून आता नव्या नियानामुसार ग्राहकांना सिलेंडर मिळण्यात देखील मर्यादा आलेल्या आहेत. वर्षाला पाहिजे तेवढे सिलेंडर आता मिळणार नसून पंधरा सिलेंडरमध्येच वर्ष भागविण्याची वेळ येणार आहे. त्याचबरोबर एका महिन्याचा कोटाही आता निश्चित करण्यात आला आहे. कोणत्याही ग्राहकाला एका महिन्यात दोनपेक्षा जास्त सिलेंडर घेता येणार नाहीत. आत्तापर्यंत घरगुती विनाअनुदानित कनेक्शन असलेल्या ग्राहकांना हवे तेव्हा आणि वर्षभरात लागतील तेवढे सिलेंडर मिळत होते. पण आता नव्या नियमांनुसार, घरगुती एलपीजी ग्राहकांना वर्षभरात केवळ १५ गॅस सिलेंडरच मिळणार आहेत.
अनुदानित घरगुती गॅस सिलेंडरसाठी नोंदणी केलेल्यांना या दराने वर्षभरात फक्त १२ सिलेंडर मिळणार आहेत. तर यापेक्षा जास्त सिलेंडरची गरज असल्यास ग्राहकांना अनुदान नसलेले सिलेंडर घ्यावे लागेल. नवीन नियमांनुसार, रेशनिंग अंतर्गत असलेल्या एका कनेक्शनवर एका महिन्यात फक्त दोनच सिलेंडर मिळणार आहेत. कोणत्याही परिस्थितीत ही संख्या एका वर्षात १५ पेक्षा जास्त सिलेंडर असू शकत नाही. (Restrictions on getting domestic gas cylinders) एखाद्या ग्राहकास जादा सिलिंडर आवश्यक असतील तर त्यासाठी जादा पैसे द्यावे लागणर असून काही कागदपत्र सादर करावी लागतील आणि तेल कंपनीकडून परवानगी घ्यावी लागेल. अशी परवानगी मिळाल्यानंतरच अतिरिक्त सिलेंडर मिळणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा