जागर न्यूज : गेल्या काही दिवसांपासून पेचात अडकलेला मंत्रीमंडळ खातेवाटपाचा निर्णय अखेर झाला असून यात अजित पवार यांची सरशी झाली आहे तर अनेक मंत्र्यांची खाती बदलण्यात आली आहेत.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर खातेवाटप दोन आठवड्यांपासून रखडले होते. अखेर राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आले असून त्याबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खातेवाटप जाहीर केले. खातेवाटप आणि खात्यांमध्ये फेरबदलाला राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन याशिया इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेल्या खात्यांच्या जबाबदारी आहे. तर उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे गृह खाते असून यासोबतच विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, उर्जा, राजशिष्टाचार ही खाती आहेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन खात्याची धुरा सोपवण्यात आली आहे. Cabinet Department announced,
इतर २६ मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे:
छगन भुजबळ – अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
दिलीपराव दत्तात्रय वळसे-पाटील – सहकार
राधाकृष्ण विखे-पाटील - महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास
सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार- वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय
हसन मियाँलाल मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य
चंद्रकांतदादा बच्चू पाटील - उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य
विजयकुमार कृष्णराव गावित- आदिवासी विकास
गिरीष दत्तात्रय महाजन- ग्राम विकास आणि पंचायत राज, पर्यटन
गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा व स्वच्छता
दादाजी दगडू भुसे- सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)
संजय दुलिचंद राठोड- मृद व जलसंधारण
धनंजय पंडितराव मुंडे - कृषि
सुरेशभाऊ दगडू खाडे- कामगार
संदीपान आसाराम भुमरे- रोजगार हमी योजना व फलोत्पादन
उदय रविंद्र सामंत- उद्योग
प्रा.तानाजी जयवंत सावंत- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
रवींद्र दत्तात्रय चव्हाण – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून),
अब्दुल सत्तार- अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन
दीपक वसंतराव केसरकर- शालेय शिक्षण व मराठी भाषा
धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम – अन्न व औषध प्रशासन
अतुल मोरेश्वर सावे – गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण
शंभूराज शिवाजीराव देसाई- राज्य उत्पादन शुल्क
कु. अदिती सुनिल तटकरे – महिला व बालविकास
संजय बाबुराव बनसोडे – क्रीडा व युवक कल्याण, बंदरे
मंगलप्रभात लोढा- कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता
अनिल पाटील – मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा