पंढरपूर : येथील डॉक्टर व पत्रकार राजेश फडे यांची अहिंसा गो सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली असून या निवडीचे राज्यभरातून स्वागत करण्यात येत आहे.
ज्येष्ठ पत्रकार व गो सेवक हिंदू युवारत्न विनायक अशोक लुणिया यांनी आयोजित केलेल्या अहिंसा अभियानांतर्गत गायीला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करा, गो मातेचा सन्मान करून त्यांना देशाच्या आर्थिक साखळीशी जोडण्याचे काम सोपविण्यात आले आहे. समाजसेवक अहिंसा साधक डॉ.राजेश रतनचंद फडे,पंढरपूर,जिल्हा सोलापूर,महाराष्ट्र यांच्याकडे अहिंसा गो सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा पदभार सोपवताना ज्येष्ठ पत्रकार व गो सेवक हिंदू युवारत्न विनायक अशोक लुणिया यांनी डॉ.राजेश फडे यांना भगवा दुपट्टा घालत अहिंसा गो सेना परिवाराची जबाबदारी सोपवून आपल्या कार्यकाळात अनेक यश संपादन करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
या निवडीबध्दल डॉ. राजेश फडे यांचे अभिनंदन होत असून पंढरीत देखील या निवडीचे जोरदार स्वागत करण्यात आले आहे. (Appointment of Dr. Rajesh Fade as National President) लंपीच्या प्रादुर्भावाने पशुपालक अस्वस्थ असून शेतकरी वर्गात चिंता व्यक्त होत आहे या पार्श्वभूमीवर लवकरच लंपी रोग होऊ नये यासाठी आलेले व्हॅक्सीन देण्याचे नियोजन करण्यात येणार आहे अशी माहिती अहिंसा गो सेनेचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजेश फडे यांनी दिली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा