जागर न्यूज : रिक्षा चालवता चालवता, आपणच रिक्षाचे मालक होण्याची इच्छा झाली आणि त्यासाठी त्याने तब्बल १५ रिक्षांची चोरी केल्याची अजब घटना सोलापुरात उघडकीस आली आहे.
मोठे होण्याची स्वप्ने अनेकजण पाहतात आणि त्यासाठी परिश्रम करतात. सोलापूर येथील दोन बहाद्दर मात्र वेगळ्याच मार्गाने मोठे होण्याचा प्रयत्न करू लागले आणि थेट तुरुंगात जाऊन बसले. आपल्याकडे रिक्षा नाही म्हणून प्रवासी वाहतूक करण्यासाठी कुंभारी परिसरातील सैफ इरफान यादगीर याने एक रिक्षा भाड्याने घेतली. त्याचा एक मित्र सलीम गदवाल हा देखील भाड्याने रिक्षा घेवून प्रवासी वाहतूक करीत होते. इमानदारीने काम करून चार पैसे मिळवत होते पण इमानदारीचे खाणे त्यांना पचेनासे झाले. भाड्याची रिक्षा चालविण्यापेक्षा आपल्या मालकीची रिक्षा असावी असे स्वप्न पाहू लागला आणि त्यासठी यादगीर याने दुसऱ्याची एक रिक्षा चोरली. तेवढ्यावर काही त्याचे समाधान झाले नाही म्हणून त्याने आणि सलीम याने मिळून तब्बल पंधर रिक्षा चोरल्या.
सैफने भाड्याने रिक्षा घेतली होती. त्यातून चांगली कमाई होत असल्याने त्याने रिक्षाचा मालक होण्याचे ठरवले. बिलालने त्याला साथ दिली. त्यांनी एमआयडीसी, जोडभावी पेठ, जेलरोड, वळसंग, बार्शी, मंद्रूप येथून १५ रिक्षा चोरल्या. दोघेही रिक्षा चोरीसाठी भाड्याच्या रिक्षातून (एमएच १३, सीटी ०७०८) एकत्र जायचे आणि येताना बिलाल चोरीची रिक्षा घेऊन यायचा. चार-पाच महिन्यांतच त्यांनी १५ रिक्षा चोरल्या होत्या. त्यांनी मालक होण्याच्या आमिषातून पहिल्यांदाच रिक्षा चोरल्या आणि दोघांनी रिक्षा विक्रीचा प्लॅन आखला. पण, एमआयडीसी पोलिसांमुळे तो फसला. रिक्षाचे मालक होण्याच्या नादात तुरुंगाची हवा खाण्याची वेळ त्यांच्यावर आली.
शहरातून दुचाकीबरोबरच रिक्षांची चोरीदेखील वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांच्या आदेशानुसार एमआयडीसी पोलिसांनी त्यांच्या परिसरातून चोरीला गेलेल्या रिक्षांचा शोध घ्यायला सुरवात केली. पोलिस नाईक चेतन रूपनर व सचिन भांगे यांना रिक्षा चोरणाऱ्यांबद्दल खबऱ्यांकडून माहिती मिळाली. पोलिस रेकॉर्डमध्ये संशयितांचा शोध घेतला, पण त्यांची चोरीची कोणतीच पार्श्वभूमी पोलिसांच्या हाती लागली नाही.
पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली. त्यावेळी त्यांनी शहर व ग्रामीणमधून चोरलेल्या रिक्षा कर्नाटकात विक्री केल्याचे सांगितले. काही रिक्षा त्या दोघांनी घराजळील महापालिका शाळा परिसरातील काटेरी झुडपात लपवून ठेवल्याचेही तपासात समोर आले. (Rickshaw thieves arrested by Solapur police) त्यानुसार पोलिसांनी सैफ व बिलाल यांनी चोरलेल्या २३ लाख ७० हजार रुपये किमतीच्या १५ रिक्षा एमआयडीसी पोलिसांनी जप्त केल्या आहेत जप्त केल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा