शोध न्यूज : खाजगी ट्रॅव्हल्स आणि आयशर टेम्पो यांच्या झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून १७ जण जखमी झाले आहेत.
शहादा बायपास मार्गावर ट्रॅव्हल्स आणि आयशर टेम्पो यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. अत्यंत जोरदार धडक असल्यामुळे ५ जणांचा जागीच मृत्यू झाला असून या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यात दोन पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातून मजुरांना घेवून जाणाऱ्या या दोन वाहनात अपघात झाला. पाडदाळा, अलखेड येथून आयशरमधून पुण्याला मजूर नेले जात होते तर खाजगी बस मधून शेल्टी ,शिरूड,कवळीथ, टेंभा या गावातून गुजरात राज्यात मजूर नेले जात होते. दोन्ही वाहनातून मजूर नेले जात असताना या वाहनांचा आपसात अपघात झाला.
दोन वाहनात हा अपघात झाला तेंव्हा प्रचंड मोठा आवाज झाला आणि दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. अपघात एवढा भीषण होता की पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आणि सतरा जण जखमी झाले असून यातील काही जखमींची प्रकृती गंभीर आहे. जखमींनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Five laborers were killed in a terrible accident) यातील एका गंभीर जखमी असलेल्या बालिकेवर शहादा येथेच उपचार सुरु करण्यात आले आहेत तर या बालिकेच्या आईचा या अपघातात मृत्यू झाला आहे. गंभीर स्वरुपात जखमी झालेली बालिका देखील मृत्यूशी झुंज देत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा