जागर न्यूज : हळदी कुंकू कार्यक्रमास जाताना दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी एका महिलेच्या गळ्यातील गंठण भरदिवसा लंपास केले.
महिलांच्या गळ्यातील दागिने पळविण्याच्या घटना पंढरपूर शहर आणि परिसरात नेहमीच घडत असतात. भरदिवसा भररस्त्यावर असे प्रकार घडत असल्यामुळे महिलांना नेहमीच असुरक्षित वाटते. आता पुन्हा एकदा असाच प्रकार घडला आहे. हळदी कुंकू कार्यक्रमासाठी चालत निघालेल्या महिलेच्या गळ्यातील ३१ ग्रॅम बजनाचे ७५ हजार रूपयांचे गंठण मोटारसायकलवरून आलेल्या दोन २५ ते ३० वयोगटातील चोरट्यांनी हिसकावून चोरून नेले. ही घटना वल्मिकीनगर, इसबावी, पंढरपूर येथे घडली. याप्रकरणी दोन अज्ञात चोरट्यांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
अनुराधा चित्रसेन पाथरूट व त्यांची मुलगी (रा. शेलारनगर, विसावा मंदिरजवळ इसबावी) हे सोमवारी घरापासून जवळ १०० मीटर अंतरावर वाल्मिकी नगर येथे अनिता दंडाण्णा कोळी यांच्या घरी हळदी कंक कार्यक्रमास चालत जात असताना समोरून दुचाकीवरुन दोघेजण आले. (The thieves stole the jewelry from the woman's neck) अनुराधा यांच्याजवळ येताच मोटार सायकलवर पाठीमागे बसलेल्या इसमाने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठन हिसकावून घेण्यासाठी गळ्याला हात लावताच तो इसम गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकावून घेत आहे हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी गंठण गळ्यावर घट्ट दाबून धरण्याचा प्रयत्न केला.
महिलेने गळ्यातील दागिना वाचविण्याचा नेटाने प्रयत्न केला परंतु त्या इसमाने गंठनचा काही भाग हिसकावून घेतला ब काही भाग अनुराधा यांनी दाबून धरल्याने त्यांच्या हातात आला. हा घडलेला प्रकार अचानकपणे घडल्याने त्यांनी आरडाओरडा करताचा रस्त्याच्या आजुबाजूस राहणारे लोक जवळ आले तेव्हा, ते दोघे चोरटे त्यांच्याकडील युनिकॉर्न मोटार सायकलवरुन विसावा मंदिराकडे जावून तेथून पंढरपुरच्या दिशेने निघून गेले. याप्रकरणी पोलिसात फिर्याद देण्यात आली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा