जागर न्यूज : रस्त्यात अडवून गाडीची चावी काढून घेण्याचा अधिकार वाहतूक पोलिसांना नसून टायरमधील हवा देखील ते सोडू शकत नाहीत, याची माहिती प्रत्येक वाहनचालकांना माहित असणे आवश्यक आहे.
वाहतुकीचे नियम पाळणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे तसे वाहतूक पोलिसांनी मागितलेली कागदपत्रे देखील त्यांना दाखवणे आवश्यक आहे. अनेकदा वाहतूक पोलीस वाहने थांबवून कायदेशीर नसलेल्या बाबी करताना दिसतात. गाडीची चावी काढून घेणे, टायरमधील हवा सोडून देणे असे कृत्य वाहतूक पोलिसांकडून होत असते परंतु ते नियम, कायद्याला धरून नाही. असे करणाऱ्या पोलिसांच्या विरोधात तक्रार करण्याचा अधिकार वाहन चालकास आहे. अनेकदा घाईगडबडीत ऑफिसला किंवा कोठेतरी जाताना वाहतूक पोलिस हात करून वाहने थांबवतात. गाडीची चावी काढून घेतात, जागेवरच दंड भरायला सांगितले जाते. पण, भारतीय मोटार वाहन कायदा १९३२ अंतर्गत कोणताही पोलिस अधिकारी तुम्हाला कधीही वाहनातून बाहेर काढू शकत नाहीत. तुमच्या गाडीची चावी कोणी काढून घेऊ शकत नाहीत. मोबाइलमधील डिजी लॉकरमध्ये ठेवलेली कागदपत्रे त्यांना दाखवून पुढील प्रवासासाठी वाहनचालक जावू शकतात.
चालान बुक किंवा ई-चालान जनरेटरद्वारे ट्रॅफिक पोलिस केवळ सरकारकडून जारी केलेले चालान बुक किंवा ई-चालान मशीन असतानाच कारवाई करू शकतात. घटनास्थळी असलेला पोलिस अधिकारी उपनिरीक्षक किंवा त्याहून अधिक दर्जाचा असेल तर तुम्ही घटनास्थळीच चलन भरू शकता. दुसरीकडे गाडीवर बसलेले असतानाही गाडी उचलण्याचे अनेकदा प्रकार घडतात. अशावेळी वाहन चालकांना अनेक अधिकार आहेत. त्यानुसार ट्रॅफिक पोलिसांना देखील काही मर्यादा असतात. वाहन चालकांकडे पुरेसी कागदपत्रे असतानाही कोणी जाणीवपूर्वक त्रास दिल्यास संबंधिताविरूध्द पोलिसांत तक्रार नोंदविता येते. तसेच जर ट्रॅफिक पोलिसांनी तुम्हाला थांबवले तर ते ड्रायव्हिंग लायसन्स दाखवण्यास सांगू शकतात. (The police have no right to take away the vehicle keys) त्यामुळे सर्व कागदपत्रे तुमच्या कारमध्ये ठेवण्याचा सल्ला दिला जातो. पण, सरकारी डिजी लॉकर या मोबाइल अॅपमध्येही चालक कागदपत्रे डाउनलोड करुन पोलिसांना ते दाखवू शकतात.
भारतीय मोटार वाहन कायदा १९३२ अंतर्गत कोणताही पोलिस अधिकारी तुम्हाला कधीही वाहनातून बाहेर काढू शकत नाहीत. तुमच्या गाडीची चावी कोणी काढून घेऊ शकत नाहीत. एवढेच नाही तर ते तुमच्या कारच्या टायरची हवाही काढू शकत नाहीत. जोपर्यंत कोणीतरी गाडीच्या आत बसले आहे, तोपर्यंत तो टो करता येत नाही. पोलिसांच्या अरेरावी विरोधात तक्रार नोंदवता येते. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला योग्य वागणूक दिली गेली नाही किंवा ट्रॅफिक पोलिसांकडून छळ झाला, या घटनेची तक्रार ऑनलाइन किंवा जवळील पोलिस ठाण्यात करण्याचा अधिकार आहे.
तुम्हाला थांबवणाऱ्या ट्रॅफिक पोलिसाची ओळख विचारण्याचा अधिकार तुम्हाला आहे. तुम्ही त्यांचा बकल नंबर किंवा नाव लिहून ठेवू शकता आणि बकल नसल्यास त्यांना ओळखपत्र विचारू शकता. जर ट्रॅफिक पोलिस कर्मचारी त्यांची ओळख लपवत असल्यास तुम्ही त्यांना तुमची कागदपत्रे सादर करण्यास नकार देऊ शकता. मोटार वाहन कायद्याच्या कलम १३० नुसार जेव्हा पोलिस अधिकारी तुम्हाला कागदपत्रे विचारतील, तेव्हा तुम्ही फक्त ड्रायव्हिंग लायसन्सच द्यावे. जर पोलिस अधिकाऱ्याने तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स जप्त केले, तर तुम्हाला तुमच्या परवान्याविरुद्ध ट्रॅफिक पोलिस विभागाने जारी केलेली वैध पावती दिली असल्याची खात्री करा. वाहतुकीचे नियम पाळणे आवश्यक आहे तसे पोलिसांनी देखील कायदा पाळण्याची गरज असते. प्रत्येकाला नियमांची माहिती असणे देखील तितकेच आवश्यक असते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा