सिंधूबाई धोंडीबा रोंगे यांनी याबाबत पोलिसात फिर्याद दिली आहे. सिंधूबाई व त्यांचे कुटूंबीय झोपले होते. त्यानंतर रात्री १० वाजण्याच्या सुमारास अमोल रोंगे हा दारू पिऊन शिवीगाळ करीत त्यांच्या घरी आला. दरवाजा उघडताच 'तू माझेवर करणी केली', असे म्हणत त्याने सिंधूबाई यांच्या डोक्यात लोखंडी पहार मारली. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या. (A woman was beaten up on suspicion of doing Karani) पती व मुलाने सोडवासोडवी करून त्यांना उपचारासाठी येथील खासगी रूग्णालयात दाखल केले. या मारहाणीत सिंधूबाई यांच्या डोकीत ८ टाके पडले असून पडल्याने हाताच्या कोपऱ्याला जखम झाली असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. केवळ करणी केल्याच्या संशयावरून ही घटना घडली असून खर्डी परिसरात याची चर्चा सुरु झाली आहे.
जागर न्यूज : करणी केल्याचा संशय घेत एकाने महिलेच्या डोक्यात थेट लोखंडी पहार घातल्याचा धक्कादायक प्रकार पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथे घडला आहे. यात ५५ वर्षे वयाची महिला जखमी झाली आहे.
विज्ञान युगात माणूस वावरत असताना देखील अजूनही भूतबाधा, करणी अशा प्रकारावर विश्वास असणारे लोक या पुरोगामी म्हणविणाऱ्या महाराष्ट्रात असून अंधश्रद्धेचा मोठा पगडा अजूनही मनावर कायम आहे. अंधश्रद्धेच्या अनेक घटना घडत असताना आजूबाजूला दिसत असतात. विशेषत: ग्रामीण भागात आणि अशिक्षित वर्गात हा पगडा अधिक असून यातून कित्येक अनुचित घटना घडताना समोर येतात. पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथे अशीच एक घटना घडली असून करणी केल्याच्या संशयावरून एकाने दारूच्या नशेत ५५ वर्षीय महिला सिंधुबाई धोंडीबा रोंगे यांच्या डोक्यात लोखंडी पहार मारली. या प्रहाराने सदर महिला जखमी झाली असून खर्डी येथील अमोल शंकर रोंगे याच्याविरोधात पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा