जागर न्यूज : पंढरपूर तालुक्यात चोरांनी पुन्हा एकदा बंद घराला टार्गेट केले असून, बंद असलेल्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी चोरी केल्याची एका घटना तालुक्यातील इसबावी येथे घडली आहे.
पंढरपूर शहर, तालुक्यासह सोलापुर जिल्ह्यात चोरांचा धुडगूस नेहमीच सुरु असतो. बस स्थानकात देखील महिला सुरक्षित नाहीत तर उपनगरी भाग देखील कायम चोरांच्या दहशतीखाली असतो. चोरटे बंद घरांना तर हमखास टार्गेट करीत असतात. बंद असलेली घरे फोडून ऐवज चोरी केला जातो त्यामुळे घर बंद करून नागरिकांना कुठे परगावी जाताही येत नाही. आता पुन्हा पंढरपूर तालुक्यातील इसबावी येथे काल पहाटेच्या सुमारास एक बंद घर फोडण्याची घटना घडली आहे. (Theft in closed house, terror of thieves) यावेळी ९४ ग्रॅम सोने व ३ भार चांदी चोरीला गेली आहे. या घटनेने पुन्हा एकदा परिसरात चोरट्यांची भीती निर्माण झाली आहे.
बुद्धदेव धोंडीबा वाघमारे (वय ६०, रा. बुद्धवंदना, इसबावी, पंढरपूर) यांच्या घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. घरात कोणी नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील पाच तोळे वजनाच्या सोन्याच्या बांगड्या, दीड तोळे वजनाचे मिनीगंठण, तीन ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, नऊ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, सात ग्रॅम वजनाची कानातील फुले, दोन ग्रॅम वजनाची कानातील फुले, सात गॅम वजनाची कानातील कर्णफुले व वेल व ३ भार वजनाचे पायातील चांदीचे पैंजण असा मुद्देमाल चोरांनी पळवून नेला आहे. चोरीची माहिती होताच घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी बानकर, पोनि अरुण फुगे, पोसई प्रशांत भागवत यांनी भेट दिली आहे. या चोरीची परिसरात चर्चा असून नागरिकात चोरांची दहशत निर्माण झालील आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा