जागर न्यूज : सद्गुरूच्या बैठकीसाठी जात असताना आयशर टेम्पोची जोराची धडक लागून महिला जागीच ठार झाल्याची घटना आज मंगळवेढा-पंढरपूर रोडवरील उजनी गेटच्या समोर घडली आहे.
कमल पांडुरंग साळुंखे (वय 53, रा.जय भवानीनगर, संत चोखामेळा नगर, मंगळवेढा) असे मयत झालेल्या महिलेचे नाव असून पती पांडुरंग साळुंखे (वय.61) हे या अपघातात जखमी झाले आहेत. पती पांडुरंग साळुंखे पत्नीला गोपनबाई बोराले रोड येथील सद्गुरु बैठकीस आज सकाळी बैठक असल्याने ते पत्नीला सोडण्यास मोटरसायकल (एम एच १३ बीए 8109) या मोटरसायकल वरून जात होते. पंढरपूर-मंगळवेढा रोडवरील उजनी गेटच्या जवळ जात असताना पाठीमागून येणारा कोंबड्या भरलेल्या आयशर टेम्पो (के.ए 63. 7613) याने जोराची धडक दिल्याने कमल साळुंखे या टेम्पोच्या चाकाखाली गंभीरपणे चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
या भागात सतत अपघात होत असल्याने जड वाहतूक तसेच कोणतेही गतिरोधक नसल्यामुळे या रस्त्यावरून सुसाट वाहने मंगळवेढ्यातून पंढरपूरकडे, पंढरपूर होऊन मंगळवेढ्याकडे जात असतात या पंढरपूर मंगळववेढा रोड वरती उत्तरेला दामाजी नगर आहे.तर पश्चिमेस चोखामेला नगर या दोन मोठ्या ग्रामपंचायत असून या ठिकाणची लोकसंख्या दहा हजाराहून अधिक आहे. अनेक वेळा या रस्त्यावर अपघात झाले असून त्यामध्ये हात पाय तुटले असून तर काहीजण गंभीर जखमी झाले आहेत. तर काहींचे जीव देखील केले आहेत.या भागात नव्या पद्धतीने बाजारपेठ निर्माण होत असल्यामुळे या ठिकाणी या रस्त्यावर मोठी सतत वर्दळ असते या ठिकाणाहून या भागात अनेक शाळा आहेत तसेच रस्त्यावर सकाळी साडेपाच वाजेपासून सायंकाळी आठ वाजेपर्यंत शालेय विद्यार्थ्यांची मोठी गर्दी असते.
या अपघाताला जबाबदार कोण? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडत आहे येथील जेष्ठ नागरिकांनी अनेक वेळा मागणी करूनही त्यांच्या मागणीला प्रशासनाने केराची टोपली दाखवली आहे. यामुळे आज निष्पाप एका महिलेला सद्गुरूच्या बैठकीला जात असताना जीव घमवावा लागल्याने नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी व वाहन चालका विषयी संताप व्यक्त केला जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा