जागर न्यूज : यंदाचा मोसमी पाउस परतीच्या प्रवासाला लागण्याआधी चांगलीच हजेरी लावू लागला असून राज्यातील काही जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
सप्टेंबर महिना सुरू होताच, राज्यात मुसळधार पावसाने थैमान घातलं. पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. अशातच राज्यात पावसाचा जोर आणखीच वाढण्याची शक्यता आहे. कारण, हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. ऑगस्ट महिन्यांत राज्यात उसंती घेतलेल्या पावसाने सप्टेंबर महिन्यात जोरदार हजेरी लावली. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला. मुंबई, पुणे, ठाण्यासह विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाने जोरदार बॅटींग सुरू आहे. अशातच पुन्हा एकदा काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
हवामान विभागाकडून वर्तवलेल्या अंदाजानुसार, राज्यातील काही भागात आजही मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने विदर्भासह मराठवाड्याला 'यलो अलर्ट' दिला आहे. याव्यतिरिक्त पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यांना देखील पावसाचा 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केल्याने दिलासा मिळाला आहेच परंतु पहिल्या दिवसांपासून राज्यात कुठे ना कुठे पाऊस पडताना दिसू लागला आहे. येत्या दोन ते तीन दिवसात राज्यभरात पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली असून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत.
अलर्ट ! पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यांना देखील पावसाचा 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे. त्यामुळं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन देण्यात आले.
मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु होण्याच्या मार्गावर आहे. परंतु मोसमी पावसाच्या अखेरच्या टप्प्यात महाराष्ट्रातील अधिकाधिक भागात सरासरीपेक्षाही अधिक पाऊस सप्टेंबर महिन्यात होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने आधीच दिला आहे. देशभरात सरासरीच्या तुलनेत १०९ टक्के पाऊस या कालावधीत होणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. (Heavy rain will fall again in the Maharashtra) ज्या भागात कमी पाउस झाला आहे आणि आजही पावसाची प्रतीक्षा आहे त्या भागांना दिलासा मिळणार आहे.
यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पावसाने चिंता वाढवली परंतु जुलै महिन्यात त्याची भरपाई केली. जुलै आणि ऑगष्ट महिन्यात राज्यातील विविध भागात पावसाने हजेरी लावली आणि काही भागात अतिवृष्टी झाली. यावर्षी धरणे लवकर भरली आणि नदी नाले तुडुंब भरून वाहिले आहेत. साहजिकच जमीनीतील पाण्याची पातळी वाढण्यास मदत झाली आहे. काही भागात पाउस नको म्हणण्याची वेळ आली तर राज्याच्या काही भागात अजूनही पावसाची मोठी प्रतीक्षा आहे. शेतकरी चिंता व्यक्त करताना दिसत आहेत. अतिवृष्टीमुळे राज्याच्या काही भागातील शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसला आहे तर काही भागात पावसाचे प्रमाण कमी आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा