जागर न्यूज : गोरगरीबाच्या केसाला धक्का लावला तर याद राखा , हा भगीरथ भालके काळ बनून उभा राहील.. असा सणसणीत इशाराच आज भगीरथ भालके यांनी दिला आहे. आमदार समाधान आवताडे यांच्यावर जोरदर प्रहार करीत भालके यांनी अधिकाऱ्यांनाही सुनावले.
मंगळवेढ्यातील जनतेला छळण्याचे काम अधिकारी करत आहे.लोकशाही पध्दतीने दोन वर्षे शांत होतो.यापुढील काळात गोरगरिबांच्या केसाला धक्का लागला तर हा भगीरथ काळ म्हणून उभा राहिल असा इशारा दिला. राष्ट्रवादी नेते भगीरथ भालके यांनी प्रांत कार्यालयासमोर बोलताना दिला. मंगळवेढ्यात अधिकाऱ्याकडून होत असलेल्या त्रासाच्या निषेधार्थ 28 मागण्याचे निवेदन घेऊन प्रांत कार्यालयावर हलगी मोर्चाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते उपस्थित जनसमुदाया समोर बोलत होतेदुष्काळी गावाला नसलेले पाणी प्रत्यक्षात कागदावर पाणी आणण्याचे काम भारतनानी केले.याच शेतीच्या पाण्यासाठी विधानसभा हलवून ठेवायला हवी होती.पण एकदाच प्रश्न उपस्थित करून आठवड्यात मंजूरी देतो.या आश्वासनावर सत्कार करून श्रेय घेतले.नारळ फोडण्यावरून बावची व पौट या रस्त्याचे काम अडवण्याचा प्रयत्न अधिकाऱ्या मार्फत केला.
तर विरोधातील ग्रामपंचायतीचा निधी अडविण्याची कोणती मोगलाई मंगळवेढ्यात आलीय. तालुक्यातील 65 छावण्याची बिले तीन वर्षांनंतर बिले अदा नाहीत.छावणी चालकांनाही वेठीस धरण्याचे काम होत आहे. बसवेश्वराचे राष्ट्रीय स्मारक समितीच अस्तित्वात नसल्यामुळे रखडले या कामाला मुहूर्त कधी मिळणार हा प्रश्न अनुत्तरीत आहे. भारतनानाच्या कामाचा विसर पडला.शहर विकास आराखड्याला प्रशासक म्हणतात कुणी केले माहीत नाही.तर मुख्याधिकारी गाणी म्हणण्यात वस्त असल्याने शहरवासीयांना देशोधडीला लावण्याचे काम या आराखड्यातून सुरू आहे. या हलगी मोर्चाला मंगळवेढ्यात प्रतिसाद देखील चागला मिळाला पण भगीरथ भालके आक्रमक झाल्याची मोठी चर्चा सुरु झाली आहे.
दोन वर्षात कोणत्याही शासकीय कार्यालयातील काम सहजरीत्या होत नाही.छावण्याची बिले प्रलंबित ठेवून कर्जबाजारी पण प्रशासनाला जाणीव नाही. त्यांची वर्तणूक बदलावी अन्यथा जनतेला रोषाला सामोरे जावे लागत आहे अशी तक्रार राहूल शहा यांनी केली तर दामाजीचे अध्यक्ष शिवानंद पाटील म्हणाले की,सीमावर्ती भागातून कामासाठी आलेल्या तालुक्यातील जनतेला वेठीस धरण्याचे काम प्रशासन करीत आहे. (Bhagirath Bhalke Aggressive against Mangalwedha administration) हा अन्याय चालूच ठेवला तर भविष्यात कुलुप लावण्याचा इशारा दिला.शासकीय कार्यालयात दोन वर्षापासून पिळवणूक होत आहे त्यांना जाब विचारणारे कोण नाही. असे अजित जगताप यांनी सांगितले. हलगीनाद करीत प्रशासनाला चांगलेच धारेवर धरण्यात आले असून या आंदोलनाला प्रतिसाद देखील चांगला मिळाला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा