जागर न्यूज : महूद - पंढरपूर रस्त्यावर एक धक्कादायक घटना घडली असून एका गाडीवर अज्ञातांनी जबर हल्ला करून धमकी देत गाडीचीही तोडफोड करण्यात आली आहे. या घटनेने पंढरपूर, सांगोला तालुक्यात खळबळ उडाली आहे.
महूद रस्त्यावर चेहऱ्यावर कपडे गुंडाळलेल्या अनोळखी ५ ते ६ हल्लेखोरांनी फॉर्च्यूनर गाडी अडवून चालकाला मारून टाकण्याची धमकी देत लोखंडी रॉडने गाडीची तोडफोड केल्याची घटना रात्री ८ वाजण्याच्या सुमारास तिसंगी येथे घडली. सांगोला तालुक्यातील आबासाहेब तुकाराम बंडगर (रा. शिरभावी, ता. सांगोला) हे ताप आल्याने दवाखान्यात जाण्यासाठी रात्री ७.४५ वाजण्याच्या सुमारास आपल्या फॉर्च्यूनर गाडीने (एम. एच. ४५ / टी. ४५००) पंढरपूरकडे निघाले होते. तिसंगी येथे इनलेट कॅनॉल ते अण्णासाहेब पाटील हायस्कूल या दरम्यानच्या रस्त्यालगत त्यांना दोन मोटारसायकली दिसल्या. तोपर्यंत तोंडाला कपडे गुंडाळलेले अनोळखी पाच ते सहाजण अचानक रस्त्याकडे आले आणि हात करून त्यांनी गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला. बंडगर यांनी गाडीचा वेग कमी केला असता सदर लोकांनी लोखंडी रॉडने गाडीच्या चारही दरवाजांवर व पाठीमागील बाजुने हल्ला चढवत तोडफोड सुरू केली.
यावेळीच त्यातील काहीजण शिवीगाळ करीत बंडगर यांना मारून टाकण्याची भाषा करू लागले. त्यामुळे तात्काळ बंडगर यांनी गाडीचा वेग वाढवून थेट पंढरपुरातील ग्रामीण पोलीस ठाणे गाठले. घडल्या प्रकाराविषयी ६ हल्लेखोरांविरूद्ध फिर्याद दाखल केली. या हल्ल्यात गाडीचे २ लाखांचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. (There was a sudden attack on Pandharpur-Mahood road) अधिक तपास पोलस निरीक्षक शिरीष हुंबे हे करीत आहेत. भर रस्त्यावर घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून जीव वाचवून बंडगर पंढरपूरपर्यंत पोहोचले. त्यांनी तेथून पळ काढला नसता तर क्दाचीत यापेक्षाही अधिक गंभीर घटना घडली असती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा