जागर न्यूज : या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण उद्या शनिवारी होत असून, ते कधी आणि कुठे दिसेल तसेच याबाबतची अन्य माहिती येथे देत आहोत.
ग्रहण ही एक महत्त्वाची खगोलीय घटना आहे. वैज्ञानिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून ग्रहणाला खूप महत्त्व आहे. वर्षातील पहिलं सूर्यग्रहण २० एप्रिल २०२३ हे कधी आणि कुठे दिसेल याबाबत जाणून घेणे प्रत्येकालाच आवडेल. त्यासाठी येथे त्याची माहिती देत आहोत. उद्याचे सूर्य ग्रहण हे २०२३ या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण १४ ऑक्टोबरच्या रात्री होणार आहे. पंचांगानुसार हे ग्रहण चित्रा नक्षत्र आणि कन्या राशीतील अश्विन कृष्ण पक्षातील अमावास्येला होत आहे. त्यामुळे या राशी आणि नक्षत्राच्या लोकांवर या ग्रहणाचा सर्वाधिक प्रभाव पडेल. हे कंकणाकृती सूर्यग्रहण असेल. यावेळी सूर्य आगीच्या वलयाप्रमाणे दिसेल. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यग्रहण अशुभ मानलं जातं. त्यामुळं या काळात विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. भारतीय कॅलेंडरनुसार, २०२३ मध्ये चार ग्रहणं होणार होती, त्यापैकी दोन सूर्यग्रहण असणार आहेत. वर्षातील पहिलं सूर्यग्रहण २० एप्रिल २०२३ रोजी होतं. वर्षातील दुसरे आणि शेवटचं सूर्यग्रहण १४ ऑक्टोबर २०२३ रोजी अश्विन अमावस्येला होणार आहे.
सूर्यग्रहणाची घटना : आपल्या सर्वांना माहीत आहे की पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि चंद्र पृथ्वीभोवती फिरतो. जेव्हा जेव्हा हे तिघे एका सरळ रेषेत येतात तेव्हा ग्रहण होतं. जेव्हा चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्यामध्ये येतो तेव्हा सूर्यग्रहण होतं आणि जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्यामध्ये येते तेव्हा चंद्रग्रहण होतं. ऑक्टोबर २०२३ मध्ये होणारं सूर्यग्रहण चित्रा नक्षत्र आणि कन्या राशीमध्ये होईल. २०२३ च्या ऑक्टोबरचं शेवटचं सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही, त्यामुळं त्याचा सुतक कालावधी वैध राहणार नाही.
दुसरं सूर्यग्रहण कधी होईल? ज्योतिषशास्त्रानुसार, २०२३ वर्षातील दुसरं सूर्यग्रहण १४ ऑक्टोबर २०२३ (शनिवार) रोजी होत आहे. यावेळी ग्रहण रात्री 08:34 वाजता सुरू होईल आणि पहाटे 02:25 वाजता संपेल. हे ग्रहण कन्या आणि चित्रा नक्षत्रात होईल. यावेळी सूर्यग्रहण पश्चिम आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, अटलांटिका, अंटार्क्टिका येथे दिसणार आहे. मात्र, हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. विशेष म्हणजे २०२३ सालचं पहिलं सूर्यग्रहणही आपल्या देशात दिसलं नाही. पुन्हा एकदा तसंच घडणार आहे.
या राशीत सूर्यग्रहण होईल : धार्मिक दृष्टिकोनातूनही सूर्यग्रहणाला विशेष महत्त्व आहे. जेव्हा चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मधून जातो तेव्हा सूर्यप्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचत नाही. या घटनेला सूर्यग्रहण म्हणतात. अश्विन महिन्याच्या अमावास्येला होणारं सूर्यग्रहण कन्या आणि चित्रा नक्षत्रात होईल. यावर्षी २ सूर्यग्रहण होणार आहेत. एक सूर्यग्रहण एप्रिल महिन्यात झालं तर दुसरे सूर्यग्रहण ऑक्टोबरमध्ये होणार आहे.
सूर्यग्रहण काय आहे : हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार सूर्यग्रहणाच्या सुतक कालावधीला खूप महत्त्व आहे, म्हणूनच या काळात शुभ कार्य केलं जात नाहीत. हिंदू धर्मात सूर्यग्रहणाला खूप महत्त्व आहे. खगोलशास्त्रीय आणि धार्मिक दोन्ही दृष्टिकोनातून सूर्य आणि चंद्रग्रहण महत्त्वाच्या घटना मानल्या जातात. याला कंकणाकृती सूर्यग्रहण म्हटलं जातं. जेव्हा चंद्र आणि पृथ्वीमधील अंतर इतकं वाढतं की चंद्र सूर्याच्या अगदी मध्यभागी येतो तेव्हा कंकणाकृती सूर्यग्रहण होतं. (Last solar eclipse of the year on Saturday) अशा स्थितीत सूर्याभोवती वलयासारखा आकार तयार होतो. या सूर्यग्रहणाला कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा