जागर न्यूज : राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार सोमवारी पंढरपूर आणि माढा दौऱ्यावर येत असून सद्याच्या राजकीय पार्श्वभूमीवर आणि मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या दौऱ्याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर खा. पवार व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे शिवसेना (ठाकरे गट) तसेच शेकापसह महाविकास आघाडीतील मित्र पक्षांच्या जिल्हातील पदाधिकारी, नेते मंडळींसमवेत बैठक घेणार आहेत. दि. २१ ते २६ ऑक्टोबर दरम्यान खा. शरद पवार यांचा महाराष्ट्रात विविध ठिकाणी दारूं होत असून, महाविकास आघाडीची पहिली बैठक पंढरपुरात होत आहे. याअंतर्गत दि. २३ ऑक्टोबर रोजी महाविकास आघाडीची जिल्हा स्तरावरील राज्यातील पहिली बैठक पंढरपुरात आयोजित करण्यात आली आहे. खा. पवार हे सोमवारी सकाळी १० वाजता कापसेवाडी (ता. माढा) येथे द्राक्ष बागायतदार मेळाव्यास उपस्थित राहून तेथून हेलिकॉप्टरने दुपारी १२ वाजता पंढरपुरात दाखल होतील. त्यानंतर १२.१५ वाजता येथील 'श्रीयश पॅलेस' मध्ये महाविकास आघाडी बैठक आयोजित करण्यात आली आहे.
दुपारी दीड वाजता नगरसेवक आदित्य फत्तेपूरकर यांच्या घरी भोजन, दुपारी २ वाजता श्री विठ्ठल रूक्मिणीचे दर्शन व इतर कार्यक्रमांनंतर दुपारी ३.३० वाजता खा. पवार हेलिकॉप्टरने परत पुणे येथे रवाना होणार आहेत. तत्पूर्वी खा. शरद पवार हे सोमवार, दि. २३ ऑक्टोबर रोजी सकाळी कापसेवाडी (ता. माढा) येथे शेतकरी मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. खा. पवार यांच्या या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष असून जनता व शेतकरी मोठ्या अपेक्षेने या दौऱ्याकडे पाहत आहे. या दौऱ्यात खा. पवार हे नेमके काय भाष्य करणार? याची उत्सुकता लागली आहे. आजतागायत अनेक मराठा समाजाचे आमदार, खासदार राज्यात व केंद्रात मंत्री झाले. राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदेही भूषिवली परंतु मराठा समाजाला अद्यापही आरक्षण मिळाले नाही ही वस्तुस्थिती आहे. मनोज जरांगे- पाटील यांनी आंतरवली सराटी येथे 'न भूतो न भविष्यती' असा एक कोटींपेक्षा जास्त मराठा समाजातील बांधवांचा मेळावा घेतला. त्यामुळे संपूर्ण राज्यातील राजकीय वातावरण अक्षरशः ढवळून निघाले आहे. गावोगावचे सकल मराठा समाजाचेकार्यकर्ते आरक्षणासाठी आक्रमक भूमिकाघेताना दिसत आहेत. या दौऱ्यात शरद पवारम राठा आरक्षण मिळवून देण्यासाठी नेमकी काय भूमिका घेतात? याचीच उत्सुकतासकल मराठा समाजाच्या बांधवांना लागली आहे.
स्थानिक प्रश्नावरही लक्ष खा. शरद पवार यांनी माढा लोकसभा tमतदारसंघाचे यापूर्वी नेतृत्व केले आहे. त्यामुळे त्यांच्याकडून स्थानिक जनतेच्याही मोठ्या अपेक्षा आहेत. (First meeting of Mahavikas Aghadi at Pandhaprur) मानेगाव उपसासिंचन योजना, बेदाणा कोल्ड स्टोरेजेस, द्राक्ष व बेदाणा संशोधन केंद्र, बेदाण्यास किमान ३०० रूपये हमीभाव मिळावा, सीना नदीवर बॅरेजेस बांधणे, थोर स्वातंत्र्यसेनानी विठ्ठलराव पाटील यांचा जामगाव येथे ध्वजस्तंभ व पूर्णाकृती पुतळा उभारावा, रस्ते आदी कामे मार्गी लावण्यासाठी खा. शरद पवार हे शासनाकडे नक्कीच ठोस प्रयत्न करतील, अशी जनतेची व शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.पवारांच्या या दौऱ्याकडे केवळ सोलापूर जिल्हाच नव्हे तर, महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा