जागर न्यूज : जगाला हादरविणाऱ्या कोरोनापेक्षाही मोठ्या साथीचा फैलाव होण्याचा अलर्ट जागतिक आरोग्य संघटनेकडून देण्यात आला असून या आजारामुळे पाच कोटी लोकांचा मृत्यू होण्याचा अंदाज देखील डब्लूएचओ ने व्यक्त केला आहे.
कोरोना महामारीने आणलेले संकट हे मोठे मानले जाते पण आता त्या पेक्षाही मोठे संकट येण्याची सूचनाच जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. नवीन आजाराची साथ कोविड महामारीपेक्षा वीस पट मोठी असण्याची शक्यता आहे. डब्ल्यूएचओचे प्रमुख डॉ. टेड्रोस अॅडानोम गेब्रेयसस यांनी म्हटलं आहे की, हा 'डिजीस एक्स' केव्हाही पसरू शकतो आणि त्यामुळे महामारी सुरू होण्याची शक्यता आहे. हा आजार अत्यंत घातक असून आणि तो टाळण्यासाठी लस बनवण्याचं काम शास्त्रज्ञ करत आहेत. डब्ल्यूएचओनं सांगितलं, की कोरोना महामारीमुळे सुमारे २५ लाख मृत्यू झाले, असा अंदाज आहे. हा नवीन आजार त्यापेक्षा जास्त प्राणघातक आहे आणि त्यामुळे सुमारे पाच कोटी जणांचा मृत्यू होण्याची शक्यता आहे. जागतिक आरोग्यतज्ज्ञांनी या नवीन आजाराबाबत म्हटलं आहे, की डिसीज एक्समुळे स्पॅनिश फ्लूसारखी स्थिती निर्माण होण्याची भीती आहे. १९१८-१९२० या कालावधीत स्पॅनिश फ्लूमुळे जगभरात पन्नास दशलक्षहून अधिक व्यक्ती मरण पावल्या होत्या.
यूके व्हॅक्सिन टास्कफोर्सचे अध्यक्ष केट बिंघम यांनी सांगितलं, की अशा महामारीमुळे लाखो जणांचा जीव जातो. पहिल्या महायुद्धात मरण पावलेल्यांपेक्षा स्पॅनिश फ्लूमुळे अकाली मरण पावलेल्यांची संख्या दुप्पट आहे. बिंघम म्हणाले, की आज पूर्वीपेक्षा जास्त विषाणू आहेत आणि त्यांचे व्हॅरिएंट्सदेखील खूप लवकर पसरतात. सर्व व्हॅरिएंट्स प्राणघातक नसले तरी त्यामुळे साथ पसरू शकते. आतापर्यंत सुमारे २५ व्हायरस फॅमिलीजची नोंद झाली आहे. शास्त्रज्ञ लवकरच लस तयार करण्यात सक्षम होतील. डब्ल्यूएचओने म्हटलं आहे, की नवीन आजारापासून नागरिकांना वाचवण्याची गरज आहे. हे सर्व संसर्गजन्य आजार आहेत आणि त्यामुळे साथ पसरू शकते. यामध्ये एबोला व्हायरस, मारबर्ग, सीव्हिअर अॅक्युट रेस्पिरेटरी सिंड्रोम, कोविड-19, झिका, मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम इत्यादींसह काही नवीन आजारांचा समावेश आहे. यापैकी 'डिसीज एक्स'ला सर्वांत धोकादायक मानलं गेलं आहे.
आरोग्यतज्ज्ञांचं म्हणणं आहे की, कोरोनापूर्वीही डिसीज एक्स अस्तित्वात होता, ज्याला कोरोना असं नाव देण्यात आलं. एक्स हा शब्द वापरला जातो. कारण रोगाचा शोध लागताच त्याला नाव देता येईल.(World Health Organization warning of an epidemic worse than Corona!) हा एक प्रकारचा प्लेसहोल्डर आहे ज्याचा वैद्यकीयशास्त्रातल्या अज्ञात रोगांसाठी वापर केला जातो. सध्या, शास्त्रज्ञांना या रोगाचं स्वरूप आणि प्रकार याबद्दल स्पष्ट माहिती नाही. त्याला डिसीज एक्स असं नाव देण्यात आलं आहे, जेणेकरून नवीन आजार सापडला की त्याचं नाव बदललं जाईल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा