जागर न्यूज : राज्याच्या विविध भागात डेंग्यू संशयित रुग्ण आढळून येत असतानाच सोलापूर जिल्ह्यातही फैलाव होऊ लागला असून एकाच दिवसात १० संशयित रुग्ण आढळल्याने आरोग्य विभाग हादरला आहे तर नागरिकांनी काळजी घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
नाशिक शहरात डेंग्यूचे सातशे रुग्ण आढळल्या नंतर नागपूर येथेही घरोघरी रुग्ण आढळून आले आहेत, राज्याच्या विविध भागत संशयित डेंग्यू बळावत असल्याचे समोर येत आहे. राज्याच्या काही भागात यामुळे खळबळ उडाली असतानाच सोलापूर जिल्ह्यापर्यंत हे लोण पोहोचले असल्याचे समोर आले आहे. सोलापूर शहर आणि परिसरात डेंग्यू आणि चिकनगुनियाचा फैलाव सुरू झाला आहे. दिवसेंदिवस रुग्णांमध्ये वाढ होते आहे. एकाच दिवसात १० संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे महापालिका सतर्क झाली असून प्रशासनाच्यावतीने विविध प्रभागात दौरे, फवारणी, काम सुरू आहे. पावसाने विश्रांती घेतली असली तरी राज्यात विविध साथीच्या आजाराने आता डोकेवर काढले आहे. महापालिकेच्या शहर व हद्दवाढ भागात कार्यरत असलेल्या नागरी आरोग्य केंद्राच्या माध्यमातून सर्वेक्षण सुरू आहे.
उघड्या आणि गटारी, साचलेले पाणी अशा बाबी डेंग्यूचा फैलाव होण्यासाठी मदत करीत नगरपालिका, ग्रामपंचायत प्रशासन अनेक ठिकाणी नागरिकांच्या जीवावर उठलेले दिसून येते. डेंग्यूचा फैलाव झाल्यास त्या त्या ठिकाणी संबंधिताना जबाबदार धरून कारवाई करण्यात यावी अशी मागणीही पुढे येताना दिसत आहे.
या सर्वेक्षणात डेंग्यूचे दहा तर चिकन गुनियाचा एक रूग्ण आढळला आहे. न्यू पाच्छा पेठ, होटगी रोड, विजापूर रोड, रामवाडी, हद्दवाढ भागात परिसरात डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे महापालिकेने सर्तकता म्हणून या भागात धुराळणी, फवारणीचे काम सुरू केले आहे. शहराला तीन ते चार दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना पाणीसाठा करावा लागत असल्याने डेंग्यू शहरात वाढण्याचा धोका वाढला आहे. नागरिकांनी पाणी उकळून घ्यावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. (Spread of dengue-like disease also in Solapur district) ज्याठिकाणी डेंग्यू सदृश्य रुग्ण आढळत आहेत, त्या ठिकाणी सर्वेक्षण करत महापालिकेची आरोग्य यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. नागरिकांनी देखील दक्षता घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहें.
टाकळीचे काय ?
पंढरपूरला लागून असलेल्या लक्ष्मी टाकळी येथील उपनगरात, प्रचंड घाणीचे साम्राज्य कायम आहे, उघड्या गटारी आणि मोकाट वावरत असलेली डुकरे यांच्यामुळे आधीपासूनच नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. या आधीही डेंग्यू सदृश्य आजाराने अनेक नागरिकांना त्रास झाला आहे. आता तर अशा त्रासाचे आक्रमण सगळीकडे होऊ लागले असून, टाकळी उपनगरात हा फैलाव होण्याच्या आधीच काळजी घेतली जावी अशी मागणी उपनागरी नागरीकातून केली जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा