जागर न्यूज : सोलापूर जिल्ह्यात चोरट्यांचे एकेक प्रताप समोर येत असतानाच आज पहाटे अज्ञात चोरट्यांनी एका मोठ्या बँकेचे एटीम फोडल्याचा प्रकार उघडकीस आला असून यातून लाखो रुपये चोरण्यात आले आहेत.
सोलापूर जिल्ह्यात अलीकडे पुन्हा चोरट्यांनी डोके वर काढले आहे, आणि आता तर करमाळा शहरातील भवानी नाका येथील आयबीडीआय बँकेचे एटीएम फोडून 13 लाख 64 हजार रुपये लंपास करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे सदरची घटना आज रविवार ता.6 ऑगस्ट रोजी पहाटे 5.30 च्या सुमारास ही एटीएम फोडी झाली. (Thieves broke ATM machine and stole lakhs) करमाळा शहरात भवानी नाक्यावरती आयबीडीआय बँकेची शाखा असून शाखेला लागूनच आयबीडीआय बँकेचे एटीएम आहे.
या एटीएम मधून 13 लाख 64 हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले. चेहरे दिसणार नाहीत अशा पद्धतीने मास्क घातले होते एटीएम फोडण्यासाठी आलेल्या चोरट्यांनी सुरुवातीला सीसीटीव्ही कॅमेरा वरती स्प्रे मारल्याने सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रीकरण होऊ शकले नाही.मात्र सुरुवातीला स्प्रे मारताना चार जण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत आहेत एटीएम फोडण्याची घटना घडत असताना सायरन वाजण्यास सुरुवात झाली तोपर्यंत चोरट्यांनी ही रक्कम लंपास केली.साधारणपणे तीन ते चार मिनिटात हे एटीएम फोडून चोरट्यांनी पैसे लांब पास केले आहेत. एटीएम साठी वॉचमन नसल्याने हे कोणाच्याही लक्षात आले नाही मात्र पहाटे एटीएम फोडी झाल्याने करमाळा शहरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे घटनास्थळी पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांनी भेट दिली असून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे या चोरीचा तपास करण्यासाठी सोलापूरवरून श्वान पथक पाचारण करण्यात आले असून या घटनेने करमाळा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा