जागर न्यूज : विविध राजकीय संकटाना तोंड देत असलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानात विषारी कोब्रा आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राउत यांच्या बंगल्यात देखील साप आढळून आला होता.
गेल्या वर्षापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भोवती राजकीय संकटे घिरट्या घालत आहेत, त्यातच हा कोब्रा एक संकट घेवून मातोश्री निवासस्थानात आला होता पण वेळीच तो दिसल्याने सावधानता बाळगता आली. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वांद्रे येथील बंगल्यात विषारी साप आढळल्याने एकच खळबळ उडाली. बंगल्याच्या आवारात पार्किंगमध्ये कोब्रा जातीचा विषारी साप आढळला. यानंतर तात्काळ सर्पमित्रांना बोलावून अखेर सापाला पकडण्यात आले.राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी अचानक एक विषारी कोब्रा दिसून आला आणि एकच गोंधळ उडाला. बंगल्याच्या पार्किंगमध्ये कोब्रा जागीचा विषारी नाग असल्याचे कर्मचाऱ्यांना दिसून आले. हा विषारी नाग पाहून अनेकांची धांदल उडाली आणि त्यामुळे एकदम गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. कर्मचाऱ्यांकडून तात्काळ सर्पमित्राला बोलावण्यात आले.
मातोश्रीवरुन वाईल्ड लाईफ ॲनिमल प्रोटेशन ॲन्ड रेस्क्यू असोशिएशनला फोन करुन साप आढळल्याची माहिती देण्यात आली त्यानंतर सर्पमित्र अतुल कांबळे हे मातोश्री निवासस्थानी गेले. हा साप 'कोब्रा' या विषारी जातीचा नाग असून त्याची लांबी अंदाजे ४ फूट होती. हा साप रेस्क्यू करून त्याची माहिती ठाणे वनविभागाच्या कंट्रोल रूमला देण्यात आली. (Venomous cobra in Uddhav Thackeray's 'Matoshree') सापाला पकडून वनविभागाच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे जंगलात सोडण्यात आले, अशी माहिती देण्यात आली आहे. दरम्यान,याआधी देखील शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानीही साप आढळल्याने गोंधळ उडाला होता. त्यानंतर आज तशीच परिस्थिती उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी निर्माण झाली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा