जागर न्यूज : घरगुती व व्यावसायिक (वाणिज्य) वीज कनेक्शनसाठी कागदपत्रांसह अचूक अर्ज करणाऱ्या ग्राहकांना आता अवघ्या २४ तासांत कनेक्शन दिले जाणार आहे. ‘महावितरण’चे कार्यकारी अभियंता रमेश राठोड यांनी अधिकाऱ्यांना तसे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता ग्राहकांना वीज कनेक्शनसाठी हेलपाटे मारावे लागणार नाहीत.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडकबाळ शाचेअंतर्गत घोडातांडा, कुलकर्णी तांडा, बोरामणी शाखा, अंत्रोळी शाखेअंतर्गत अर्ज केलेल्या ग्राहकांना उपकार्यकारी अभियंता राजकुमार कलशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा अभियंता आलम शेख, गणेश कांबळे, राजशेखर गुरव यांनी २४ तासांत नवीन वीज कनेक्शन दिले. अशोक हनमंत कोळी, छाया शिवानंद राठोड, तुकाराम पवार, संगमेश्वर शरणार्थी, शिवाजी बेळे यांनी पहिल्यांदाच वीज कनेक्शनसाठी अर्ज केला होता. काही दिवस आता वीज कनेक्शन मिळणार नाही, असा त्यांचा समज होता. पण, त्या ग्राहकांना ‘महावितरण’ने एका दिवसातच कनेक्शन दिले.
विशेष म्हणजे त्यातील दोघांना स्वत:हून ऑनलाईन अर्ज करता येत नव्हता. त्यांचे अर्ज अधिकाऱ्यांनी स्वत: कार्यालयात बसून भरला आणि कनेक्शन दिले. वीजेची लाईन त्यांच्या घराजवळून गेल्याने त्यांना तत्काळ कनेक्शन दिले. ग्रामीणमचे कार्यकारी अभियंता रमेश राठोड यांनी त्या अधिकाऱ्यांच्या कामाचे कौतूक केले आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनाही नवीन कनेक्शन तत्काळ मिळते, पण त्यांनी अर्ज केल्यानंतर सेवा शुल्क भरावे. तसेच कनेक्शनपासून जवळ वीजेची लाईन केली असल्यास त्यांनाही काही दिवसात कनेक्शन दिले जात आहे. सध्या ‘महावितरण’चे ग्रामीणमध्ये घरगुती व व्यावसायिक ग्राहाकांची संख्या एक लाख ४५ हजार तर शेतीपंपाचे ग्राहक एक लाख दोन हजारापर्यंत आहेत.
ज्या नवीन ग्राहकांना घरगुती किंवा वाणिज्य कनेक्शन घ्यायचे आहे, त्यांनी कागदपत्रांसह ‘महावितरण’कडे करावा. शाखा अभियंता कार्यालयाकडून त्यांची पाहणी होईल आणि २४ तासांत त्या ग्राहकाला वीज कनेक्शन मिळेल. (Electricity connection will be available within 24 hours) तसे निर्देष सर्व शाखा अभियंत्यांना दिले आहेत असे महावितरणचे कार्यकारी अभियंता रमेश राठोड यांनी सांगितले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा