जागर न्यूज : ऐन पावसाळ्यात सांगोला आणि माळशिरस तालुक्यातील ९ गावांमध्ये टॅंकरने पाणी पुरवठा सुरु आहे. पाण्याअभावी चारा पिके जळून गेली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे
मागील काही दिवसांपासून राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. अनेक नद्यांना पूर आला आहे, शेती पाण्याखाली गेल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यात नागरिक अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पाऊस पुरेशा प्रमाणात नसल्याने सांगोला आणि माळशिरस तालुक्यातील ९ गावांमध्ये ऐन पावसाळ्यात देखील टॅंकरने पाणी पुरवठा सुरु आहे. पाण्याअभावी चारा पिके जळून गेली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे. पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे यांनी अधिवेशनामध्ये मंगळवेढा तालुक्यात चारा छावण्या सुरु करण्याची मागणी केली आहे. सांगोला तालुक्यातील कटपळ येथे ऐन पावसाळ्यात भीषण पाणीटंचाई जाणावत आहे. येथे दिवसभरात दोन टॅंकरने पाणी पुरवठा सुरु आहे. येथे जनावरांच्या पाण्याची व चाऱ्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.
चाऱ्याअभावी व पाण्याअभावी येथील पशूधन धोक्यात आले आहे. सध्याच्या राजकीय साठमारीमध्ये नेते व अधिकारी व्यस्त आहेत. तर दुसरीकडे मात्र सर्वसामान्य जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी दाही दिशा फिरण्याची वेळ आली आहे. (Water-tankar-in-solapur-district-rainy-season) पावसाने सोलापूर जिल्ह्यावर अवकृपा दाखवली आहे. येत्या आठ दिवसात मोठा पाऊस झाला नाही तर जिल्ह्यात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा