जागर न्यूज : सातत्याने इतर पक्षाच्या नेत्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करणारे भाजपचे किरीट सोमय्या भलतेच गोत्यात आले असून त्यांचा एक अश्लील आणि आक्षेपार्ह व्हीडीओ बाहेर आल्याने भारतीय जनता पक्ष देखील अडचणीत आला असताना हे भाजपचेच कारस्थान असल्याचा आरोप होऊ लागला आहे.
स्वत: आणि भाजप स्वच्छ आणि बाकी सगळे भ्रष्टाचारी असल्याचा आभास निर्माण करणारे किरीट सोमय्या यांचा एक अत्यंत अश्लील व्हिडीओ समोर आल्याने आज राज्यातच नव्हे तर देशभरात मोठी खळबळ उडाली आहे. साहजिकच विरोधी पक्षाने हे प्रकरण उचलून धरले आहे. विशेष म्हणजे एका वृत्त वाहिनीने हा व्हिडीओ प्रसारित केला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या कथित आक्षेपार्ह व्हिडीओवरुन विरोधकांच्या हाती आयतं कोलित मिळालं आहे. या कथित आक्षेपार्ह व्हिडीओ प्रकरणाचे पडसाद पावसाळी अधिवेशनातही उमटले.विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोमय्या यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचं आश्वासन दिलं.
या प्रकरणावर आता शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. तसेच हा व्हिडीओ भाजपनेच व्हायरल केल्याचा गंभीर आरोपही सुषमा अंधारे यांनी केला आहे. हा आरोप करताना सुषमा अंधारे यांनी म्हटलं की, किरीट सोमय्या यांनी केलं ते वाईटच आहे. पण भाजपने अनेक गोष्टी लपवल्या आणि जिरवल्या आहेत. या व्हिडीयोबाबत चर्चा करावी असा हा व्हिडीओ नाही. महिलांची गोपनीयता ठेवली पाहिजे. मात्र हा व्हिडीओ देखील भाजपनेच व्हायरल केला आहे. अनेक अस्वच्छ लोक सोबत घेतल्यावर त्यांच्यावर आरोप करणारा माणूसच अस्वच्छ आहे, हे त्यांना दाखवायचं आहे. अये अंधारे म्हणाल्या आहेत.
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस खरंच कारवाई करतील का? असा प्रश्न आहे. याअगोदर त्यांच्याकडे अनेक जणांनी कारवाई करण्याची मागणी केली, पण त्यांनी काय केलं. किरीट सोमय्या यांची उपयुक्तता संपली आहे. त्यामुळे भाजपला त्यांना डॅमेज करून सोडून द्यायचं आहे, असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे. दरम्यान भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडीओवरून राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. (BJP's Somayya in trouble, excitement in the state!) किरीट सोमय्या यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडीओ प्रकरणाचे पडसाद विधीमंडळातही उमटले आहेत. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी किरीट सोमय्या यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी किरीट सोमय्या व्हिडिओ प्रकरणावर विधीपरिषदेत प्रतिक्रिया दिली आहे.
'या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करणार. तसेच या प्रकरणातील पीडित महिलेची ओळख सांगता येणार नाही, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली दिली आहे.कथित आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणाचे राज्यभर पडसाद उमटत आहेत. ठाकरे गटाच्या अनेक महिलांनी किरीट सोमय्या यांच्या विरोधात आंदोलन पुकारलं आहे. किरीट सोमय्या यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत सोमय्या यांच्या प्रतिमेस जोडे मारून निषेध केला जात आहे. किरीट सोमय्या आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणाचे विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही पडसाद उमटले आहेत. 'किरीट सोमय्या यांना केंद्राची सुरक्षितता आहे. काही महिलांच्या मजबुरीचा फायदा घेतला आहे. ८ तासाचे व्हिडिओ मी सभापतींना देणार आहे. ही व्यक्ती महाराष्ट्रद्रोही आहे, असा गंभीर आरोप अंबादान दानवे यांनी किरीट सोमय्या यांच्यावर केला. अंबादास दानवे यांच्यानंतर आमदार अनिल परब यांनीही त्यांच्या सुरात सूर मिसळत सोमय्यांवर कारवाईची मागणी केली
ठाकरे गटाच्या मागणीवर प्रतिक्रिया देताना फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'अंबादास दानवेंनी व्यक्त केलेला विषय गंभीर आहे. आम्ही त्यांच्या मताशी सहमत आहे. आपल्याकडे काही तक्रारी असतील, त्या आमच्याकडे द्या. आम्ही त्याची चौकशी करू. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करणार आहे. महिलेची ओळख सांगता येणार नाही.या प्रकरणाची सखोल व उच्चस्तरीय चौकशी केली जाईल'. असे फडणवीस म्हणाले आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा