जागर न्यूज : राज्यासाठी पुढील पाच दिवस अत्यंत महत्वाचे ठरणार असून चक्रीवादळाचे सावट आणि अति मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे .
देशातील अनेक भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यातच आता 18 जुलैच्या सुमारास चक्रीवादळाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचा परिणाम हा राज्यातील पावसाच्या स्थितीवर देखील होणार आहे. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात पुढील पाच दिवस काही ठिकाणी हलका ते मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार 18 ते 20 जुलैदरम्यान गोवा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील 4-5 दिवस मान्सून सक्रिय राहण्याची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल असा इशारा देण्यात आला आहे. मोसमात पहिल्यांदाच मराठवाड्यातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज कोकण आणि विदर्भात काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर चंद्रपूरमध्ये जोरदार पाऊस पडू शकतो. (A hurricane! Heavy rain forecast in maharashtra) कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात आज यलो अलर्ट तर विदर्भातही यलो अलर्ट देण्यात आला आहे
पुण्याला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुण्यात देखील आज पावसाची शक्यता आहे. मान्सून हंगाम सुरू झाल्यापासून राज्यात पहिल्यांदाच 16 जुलै रोजी सामन्य पावसाची नोंद करण्यात आली आहे. कोकण आणि विदर्भ प्रथमच सामान्य श्रेणीत आले आहेत. तर मराठवाड्यात अद्यापही सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद आहे. मात्र पुढील काही दिवसांत ही त्रुटी भरून निघेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा