जागर न्यूज : पंढरपूर शहर तालुक्यासह अन्य जिल्ह्यात दहशत निर्माण करून गुन्हे करीत असलेल्या पंढरपूरच्या टोळीला पोलिसांनी मोठा दणका दिला असून त्यांच्यावर थेट मोक्का कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे, त्यामुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.
सदरची कारवाई ही शिरीष सरदेशपांडे पोलीस अधिक्षक सोलापुर ग्रामीण, श्री. हिंमत जाधव अपर पोलीस अधिक्षक सोलापुर ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली डॉ. श्री. अर्जुन भोसले उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपुर उपविभाग, पोलीस निरीक्षक मिलींद बी पाटील पंढरपुर तालुका पोलीस ठाणे, वाचक पोसई हमीद शेख, हवालदार शिवाजी पाटील, सचिन तांबिले, राहुल लोंढे यांनी केलेली आहे.
पंढरपुर तालुका, पंढरपुर शहर, सांगोला, मिरज ग्रामीण जि सांगली, सोलापुर शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये गर्दी, मारामारी, खुन करणे, खुनाचा प्रयत्न करणे, खंडणी मागणी करणे, वाळु चोरी, अपहरण करणे, बेकायदेशीर हत्यार बाळगणे, चोरी, जबरी चोरी करणे, घरात घुसून मारहाण करणे, सरकारी नोकरावर हल्ले करणे यासारखे गंभीर गुन्हे करून समाजामध्ये अशांतता व दहशतीचे वातावरण निर्माण करून सर्वसामान्य जनतेचे जनजीवन विस्कळीत करून दहशत माजविणारे टोळीप्रमुख १) प्रतिक उर्फ बबलु हरिभाउ प्रक्षाळे वय ३२ वर्षे, रा. भटुंबरे ता. पंढरपूर जि सोलापुर व टोळीसदय २) सोमनाथ दिगंबर खंकाळ, वय ३९ वर्षे, रा. गणेश नर्सरी जवळ, गजानन नगर, पंढरपूर ता. पंढरपूर जि सोलापुर ३) निखील कृष्णा राजुरकर, वय ३२ वर्षे रा. हणुमान नगर, टाकळी रोड, पंढरपूर ता. पंढरपूर जि. सोलापुर ४) रविंद्र हरिभाऊ गुरव वय ४२ वर्षे, रा. रूक्मिणी विद्यापीठ शेजारी, रेल्वे स्टेशन जवळ, पंढरपूर ता. पंढरपूर जि. सोलापुर ५) विक्रांत दशरथ माने रा. पढरपूर जि. सोलापूर यांचेविरुध्द मोक्का प्रस्ताव तयार करण्यात आला होता.
विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापुर परीक्षेत्र कोल्हापुर यांची महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियमाचे (मोका) कायदयाअंतर्गत विविध कलमान्वये कारवाई करण्याची मंजुरी मिळालेवर सदर गुन्हयाचा अधिक तपास डॉ. अर्जुन भोसले उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपुर उपविभाग यांनी करून यातील टोळीप्रमुख व टोळी सदस्य यांचेविरूध्द अंतिम दोषारोपपत्र पाठविण्याची अपर पोलीस महासंचालक सो महाराष्ट्र राज्य मुंबई यांची अंतिम मंजुरी घेवुन टोळीप्रमुख व टोळीसदस्य यांचेविरूध्द मोका न्यायालयामध्ये दोषारोपपत्र सादर करण्यात आले आहे.(Action under Mococa against criminal gang in Pandharpur) सदर टोळीतील पाहिजे असलेले टोळीसदस्य १) निखील कृष्णा राजुरकर, वय ३२ वर्षे रा. हणुमान नगर, टाकळी रोड, पंढरपूर ता. पंढरपूर जि. सोलापुर २) रविंद्र हरिभाऊ गुरव वय ४२ वर्षे, रा. रूक्मिणी विद्यापीठ शेजारी, रेल्वे स्टेशन जवळ, पंढरपूर ता. पंढरपूर जि. सोलापुर ३) विक्रांत दशरथ माने रा. पढरपूर जि. सोलापूर हे फरारी असुन त्यांचा शोध घेण्याचे चालू आहे. या कारवाईमुळे गुन्हेगारी विश्वात मोठी खळबळ उडाली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा