जागर न्यूज : सोलापूर जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण वाढले असून गेल्या सहा महिन्यात जिल्ह्यात तब्बल ३९१ जणांचे मृत्यू झाले असल्याची आकडेवारी समोर आली आहे. वाढत्या अपघातावर नियंत्रण आणण्याची मोठी गरज निर्माण झाली आहे.
जिल्ह्यातील जवळपास सगळेच रस्ते सिमेंटचे आणि रुंद झाले आहेत परंतु तेंव्हापासून अपघाताची संख्या वाढत आहे आणि वेग देखील अमर्याद झालेला आहे. प्रत्येकालाच मोठी घाई झाली असून कुणाच्या जीवाचा विचार कुणी करीत नसल्याचे दिसत आहे. अत्यंत बेपर्वाईने वाहने चालवली जातात आणि त्यात निष्पाप लोकांचे बळी जात आहेत. सोलापूर जिल्ह्यात रस्त्यांची कनेक्टिव्हिटी वाढल्यानंतर वाहनांचा वेग प्रचंड वाढला आहे. दुसरीकडे वाहनचालक शॉर्टकटच्या नादात जीव धोक्यात घालत आहेत. हेल्मेटचा वापर केला जात नाही. चिंतेची बाब म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत यंदा जानेवारी ते जून या सहा महिन्यांत ३६६ अपघातात तब्बल ३९१ जणांचा म्हणजेच सरासरी दररोज दोन मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
सोलापूर जिल्ह्यात रस्त्यांची कनेक्टिव्हिटी वाढल्यानंतर वाहनांचा वेग प्रचंड वाढला आहे. दुसरीकडे वाहनचालक शॉर्टकटच्या नादात जीव धोक्यात घालत आहेत. हेल्मेटचा वापर केला जात नाही. चिंतेची बाब म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत यंदा जानेवारी ते जून या सहा महिन्यांत ३६६ अपघातात तब्बल ३९१ जणांचा (सरासरी दररोज दोन) मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. रस्ते चौपदरी झाल्यानंतर अपघात कमी होतील, अशी आशा होती. पण, तरीदेखील अपघात व अपघाती मृत्यू वाढले आहेत. राज्यातील सर्वाधिक अपघात होणाऱ्या जिल्ह्यात सोलापूर नेहमीच टॉप-५ मध्ये आहे. परंतु, संबंधित यंत्रणेला त्याचे गांभीर्य नाही. टोल नाक्यांवर महामार्ग पोलिस, तालुका, शहराच्या ठिकाण वाहतूक शाखेचे स्थानिक पोलिस आणि महामार्गांवर इंटरसेप्टर वाहन उभे असते. मात्र, त्याठिकाणी बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लागावी, त्यांचे प्रबोधन व्हावे म्हणून कारवाई होत नाही तर दंडाची वसुली हाच त्यांचा हेतू असल्याची ओरड आहे. दंड केला की ती बेशिस्त वाहने तशीच सोडून दिली जातात. हा प्रकार देखील धोकादायक ठरत आहे.
खासदारांच्या अध्यक्षतेखाली रस्ता सुरक्षा समिती, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र रस्ता सुरक्षा समिती आणि त्यात प्रत्येक विभागातील वरिष्ठ अधिकारी असतात. समितीची दरमहा किंवा तीन महिन्यातून बैठक होऊन अपघात रोखण्यासाठी नेमके काय करायला हवे, यावर सविस्तर चर्चा होते. (The number of accidents increased in Solapur district) वाहन चालविण्याचा परवाना नसतानाही वाहन चालवणे, अनफिट वाहने रस्त्यावर, ट्रिपलसीट, विनाहेल्मेट, विना सिटबेल्ट वाहन चालवणे, शॉर्टकटसाठी विरुद्ध दिशेने वाहन चालविणे असे प्रकार मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात ३७ अपघात आणि १७ मृत्यू सहा महिन्यांतच वाढले आहेत. वाढत्या अपघाताचा विषय गंभीरपणे हाताळण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा