जागर जागर न्यूज : आठवडा बाजारात हात सफाई करणाऱ्या भामट्याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्यानंतर त्यांचाकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात सांगोला पोलिसांना यश आले आहे.
सांगोला येथील आठवडा बाजारातून तीन चोरट्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरी केलेले 13 महागड्या मोबाईलसह एकूण 3 लाख 24 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी दिली आहे.तालुक्यात आठवडा बाजारातून मोबाईल चोरीच्या घटना वाढल्या होत्या. त्या अनुषंगाने सांगोल्याचे पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी आठवडा बाजारावर साध्या वेशातील पोलिसांची गस्त वाढवली होती. दिनांक 18 जून रोजी सांगोला येथील आठवडा बाजारामध्ये गस्त करत असताना एक महिला व दोन व्यक्ती संशयरीत्या आढळल्याने या तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्याजवळ एकूण 13 महागडे मोबाईल्स व गुन्ह्यात चोरी करता वापरण्यात आलेली मोटरसायकल असे एकूण सुमारे 3 लाख 24 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
बबन धुळा तुपे (वय - 60), नितीन अर्जुन तुपे (वय - 30) व शहिदा महादेव तुपे (वय - 38, सर्व रा. पानवण, ता. माण, जि. सातारा) अशी आहेत. त्यांच्याबाबत अधिक चौकशी केली असता ते रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचेही माहिती अनंत कुलकर्णी यांनी दिली. हा तपास पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड, पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्ता वजाळे, विकास क्षीरसागर, पोलीस नाईक बाबासाहेब पाटील, केदारनाथ भरमशेट्टी, लक्ष्मण वाघमोडे व युसुफ पठाण यांनी केला आहे.
सांगोला तालुक्यातील आठवडा बाजारातून मोबाईल चोरीच्या घटना वाढल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलिसांना साध्या वेशातील गस्त घालण्याचे आदेश दिले आहेत. (Theft in the weekly market, the police made an arrest) चोरीसह इतर घटना घडू नये म्हणून सध्या पोलिसांची गस्त यापुढे वाढवण्यात येईल अशी माहिती सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी दिली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा