जागर न्यूज : सोलापूर ग्रामीण पोलीस दलात असलेल्या पोलीस हवालदाराने गळफास घेवून आत्महत्या केल्याची एक धक्कादायक घटना समोर आली असून या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली असून अस्वस्थता देखील दिसत आहे.
सोलापूर शहर परिसरातील कविता नगर पोलिस लाईनमधील राहत्या घरातग्रामीण पोलिस दलातील पोलिस हवालदाराने किरण साळुंखे लेगीचच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. किरण अरुण साळुंखे ( वय ४६) असे आत्महत्याकेलेल्या हवालदाराचे नाव आहे. लेडीज बेडरूममधील लेगीजच्या साह्याने गळफास घेतल्याच्या स्थितीत ते आढळले. (Suicide of Constable of Solapur Rural Police Force) त्यांना उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले. या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे.
हवालदार अरुण साळुंखे यांच्या घराचा दरवाजा सकाळपासून उघडला गेला नाही हे त्यांच्या शेजारच्यांच्या लक्षात आले शेजाऱ्यांनी या घटनेची माहिती ११२ वर फोन करून दिली. त्यानंतर जेलरोड पोलिस ठाण्याच पालिस ह घटनास्थळा दाखल झाले. त्यांनी घरात पाहणी केल्यानंतर तेथे संशयास्पद काही आढळले नाही, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली. दरम्यान, मृत किरण साळुंखे याचा मोबाइल हस्तगत केल्याची माहिती पोलिसांनी दिली.. त्यांची पत्नी चारधामयात्रेला गेली होती. त्यानंतर ही घटना घडली आहे या घटनेने संपूर्ण शहर पोलिस दलात व ग्रामीणपोलिस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत किरण साळुंखे हे बार्शी पोलिस ठाण्यात कार्यरत होते. यापूर्वीही त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. आत्महत्या केलेल्या किरण साळुंखे यांनी यापूर्वीही दोन ते तीन वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली. दरम्यान जेलरोड पोलिस ठाण्यात अज्ञात कारणातून आत्महत्या केल्याची नोंद करण्यात आली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा