जागर न्यूज : सोलापूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून गृह विभागाने हे आदेश काढले आहेत. कार्यकाळ पूर्ण केलेल्या अधिकाऱ्यांचा देखील यात समावेश आहे.
राज्याच्या गृह विभागाने ११३ नि:शस्त्र पोलिस निरीक्षकांच्या विनंती बदल्या केल्या. दुसरीकडे एकाच ठिकाणी तीन वर्षांहून अधिक काळ पूर्ण केलेल्या राज्यातील ३३६ पोलिस निरीक्षकांच्या देखील बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात सोलापूर जिल्ह्यातील दोन नि:शस्त्र पोलिस निरीक्षक तर कार्यकाळ पूर्ण केलेल्या १२ पोलिस निरीक्षकांचा समावेश आहे.जिल्ह्यातील केगाव येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रावरील दीपक पाटील यांची बदली सोलापूर ग्रामीणला झाली आहे. त्यांनी बदलीसाठी शासनाकडे विनंती केली होती. तसेच प्रशिक्षण केंद्रातील पोलिस निरीक्षक रामचंद्र चोपडे यांची ठाणे शहर तर हर्षवर्धन बारवे यांची महामार्ग सुरक्षा पथकात, सिद्धेश्वर जंगम यांची सांगलीला तर वैष्णवी पाटील, चंद्रकांत माने या दोघांची सोलापूर शहरामध्ये बदली करण्यात आली आहे.
सोलापूर शहर पोलिस दलातील पोलिस निरीक्षक बजरंग साळुंखे, कमलाकर पाटील यांची सोलापूर ग्रामीणला बदली झाली आहे. सोलापूर ग्रामीणचे राजेश नंदीमठ यांची मुंबई शहरमध्ये, धनंजय जाधव यांची नगरला, रामदास शेळके व अरुण पवार या दोघांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागात, विकास दिंडुरे यांची देखील सोलापूर ग्रामीण पोलिस दलात बदली झाली आहे. बदलीनंतर त्या जागेवर पर्यायी अधिकारी येईपर्यंत संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वाट न पाहता बदली झालेल्यांना तत्काळ कार्यमुक्त करावे, असेही आदेशातून स्पष्ट केले आहे. शुक्रवारी गृह विभागाचे अप्पर पोलिस महासंचालक (आस्थापना) संजीव कुमार सिंघल यांनी बदल्यांचे आदेश काढले आहेत.
सोलापूर शहर पोलिस दलातील दोन, ग्रामीण पोलिस दलातील चार आणि केगाव येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रातील नि:शस्त्र पोलिस निरीक्षक व इतर पोलिस निरीक्षक, अशा तब्बल सहा जणांची बदली झाली आहे. दरम्यान, शहरातील काहीजण बदलीद्वारे ग्रामीणला रुजू होतील. पण, या बदलीतून जालन्यातून शिरीष हुंबे हे सोलापूर ग्रामीणला हजर होतील. तर बीडमधील पोलिस निरीक्षक महादेव राऊत, गुन्हे अन्वेषण शाखेतील श्रीशैल गजा आणि राज्य गुप्तवार्ताचे विभागाचे उमाकांत शिंदे, नानवीज पोलिस प्रशिक्षण केंद्रातील सुरेश वसेकर या पाच जणांची बदली सोलापूर शहर पोलिस दलात झाली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा