जागर न्यूज : आषाढी एकादशीच्या महापूजेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंढरीत आल्यानंतर ते जेथे असतील तेथे ग्रामपंचायत कर्मचारी 'भीक मागो' आंदोलन करणार आहेत. तसा इशाराच या कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील महूद ग्रामपंचायतींचे वार्षिक उत्पन्न ऑनलाईन वेतन प्रणालीवर भरण्याच्या नावाखाली राज्यातील ग्रामपंचायती मध्ये काम करणाऱ्या सुमारे ५५ हजार कर्मचाऱ्यांचा पगार गेल्या तीन महिन्यापासून शासनाने थकीत ठेवला आहे. यामुळे ग्रामपंचायत कर्मचारी व त्यांच्या कुटुंबाची उपासमार होत असल्याने आषाढी वारीच्या दिवशी गुरुवार(ता.२९)रोजी पंढरपूर येथे मुख्यमंत्र्याच्या दौऱ्याच्या ठिकाणी ग्रामपंचायत कामगार युनियनच्या वतीने भिक मांगो आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती युनियनचे प्रदेश सरचिटणीस दिलीप जाधव यांनी दिली आहे. राज्यातील २७ हजार ८४४ ग्रामपंचायतीमधील ५५ हजार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन गेल्या तीन महिन्यापासून थकीत ठेवले आहे.त्यामुळे ग्रामपंचायत कर्मचारी व त्याच्या कुटुंबाची उपासमार सूरू आहे.राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्याना किमान वेतन कायद १९४८ नुसार मिळणाऱ्या किमान वेतनाचे दर उद्योग,ऊर्जा व कामगार विभागाकडून दर पाच वर्षानी पुर्ननिर्धारित केले जातात.
एप्रिल २०१८ पासून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे किमान वेतन शासन अनुदान हिस्सा ऑनलाईन पद्धतीने कर्मचाऱ्यांच्या स्वताःच्या बँक खात्यावर प्रकल्प संचालक ग्राम स्वराज्य अभियान केंद्र पुणे यांच्यामार्फत केले जाते. एक किमान वेतन अदा करीत असताना नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला एप्रिल मध्ये ग्रामपंचायतीचे स्वउत्पन्न ग्रामपंचायत कर्मचारी ऑनलाईन वेतन प्रणालीवर(ERP) लॉगीन नोंद करणे गरजेचे आहे. परंतु ग्रामपंचायतचे उत्पन्न गेल्या तीन महिन्यापासून भरण्याचे काम संथ गतीने सुरू असल्याने व १५ जून २०२३ अखेर २७ हजार ग्रामपंचायती पैकी अंदाजे २५० ते २६० ग्रामपंचायतीने त्यांचे स्व उत्पन्न ERP प्रणालीवर नोंद केली नसल्याने राज्यातल्या ५० ते ६० हजार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन प्रकल्प संचालक पुणे यांनी रोखून ठेवले आहे.ग्राम पंचायतीचे स्वउत्पन्न भरण्याची जबाबदारी ग्रामसेवक यांची असताना त्यांच्यावर कोणतीच कारवाई केली जात नाही.
अशा बेजबाबदार वागण्यामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन गेल्या तीन महिन्यापासून मिळत नसल्याने ग्रामपंचायत कर्मचारी व त्याच्या कुटुंबाची उपासमार होत आहे म्हणुन महाराष्ट्र राज्य ग्रामपंचात जिल्हा परीषद नगरपरीषद कामगार युनियनच्या वतीने २९ जून रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आषाढी वारी निमित्त पंढरपूर दौऱ्यावर येत आहेत. (Gram Panchayat employees will beg in the Ashadhi Yatra) ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे रखडलेले वेतन तात्काळ अदा करण्यात यावे या मागणीकडे मुख्यमंत्री यांचे लक्ष वेधण्यासाठी पंढरपुर शहरात जेथे उपस्थित असतील तेथे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वतीने भीक मांगो आंदोलन करण्यात येणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा