जागर न्यूज: शाळेच्या पहिल्या दिवसासाठी तालुक्यातील अनेक शाळा,विद्यार्थी, शिक्षक,आणि पालक स्वागतासाठी सज्ज असताना सिमावर्ती भागात असलेल्या लवंगी (मंगळवेढा) येथील शाळेत शिक्षक नसल्यामुळे पालकांनी पहिल्या दिवशी शाळेला कुलूप ठोकून शिक्षण खात्याच्या गलथान कारभाराचे स्वागत केले.
एकिकडे शाळा सुरु होण्यापुर्वीची लगबग चालु असतांना लवंगी येथे वेगळचं चित्र पाहायला मिळत. पाणी प्रश्नाची झळ राष्ट्रीय पातळीवर नेलेल्या तालुक्यातील लवंगी येथे पहिली ते चौथी या वर्गासाठी चार शिक्षक आहेत. प्रत्यक्षात मात्र हे शिक्षक कार्यरत नसल्यामुळे इथल्या स्थानिक पालकांना स्थानिक स्वयंसेवकाची मदत घ्यावी लागत आहे. त्यांना पदरमोड करून दरमहा प्रत्येकी पाच हजार रुपये मानधन दिले जाते, परंतु यंदा नवीन शैक्षणिक वर्षांमध्ये एकही शिक्षक दिला नसल्यामुळे पहिल्या दिवशी पालकांनी शाळेला कुलूप ठोकून या नवीन शैक्षणिक वर्षाचे स्वागत केले आहे सीमावर्ती भागात असल्यामुळे तालुक्यातील अनेक प्राथमिक शिक्षकांनी तालुक्याच्या जवळची शाळा निवडल्यामुळे, सीमावर्ती भागातील शिक्षकाची नोकरी करण्यासाठी अनेक शिक्षकांची मानसिकता होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा शैक्षणिक खेळ खंडोबा होत आहे
मंगळवेढा तालुक्यामध्ये शिक्षकांच्या मोठ्या प्रमाणात जागा रिक्त आहेत परंतु या रिक्त जागा भरण्यासाठी शिक्षण विभागाने कसल्याच प्रकारची धास्ती घेतली नाही. त्यामुळे तालुक्याच्या सिमावर्ती भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यात अंधार निर्माण झाला आहे. त्यामुळे आज पहिल्याच दिवशी पालकांनी शाळेला कुलूप टाकून शाळेत स्थान मांडले आहे. दरम्यान दोन शिक्षक व दोन स्वयंसेवक लवंगी शाळेत असून एका शिक्षकाबद्दल स्थानिक तक्रार आहे, सोमवार पर्यत आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकातून नवीन शिक्षक तालुक्याला मिळणार आहेत. त्यावेळी त्यांना शिक्षक उपलब्ध करून देऊ असे प्र. गट शिक्षणाधिकारी पोपटराव लवटे यांनी सांगितले आहे.
विद्यार्थी पटप्रमाणे या शाळेला गेली दोन वर्षापासून शिक्षक दिलेले नाहीत. आम्ही खिशातील पैसे घालून पालकांनी लोकसभागातून खाजगी नियुक्त शिक्षकांचे मानधन दिले. (Parents locked the school on the first day) शासन शिक्षणावर कोट्यावधी रुपये खर्च करत असताना सीमावर्ती भागात शिक्षक देत नसल्याने आम्ही शाळेला कुलूप लावले आहे,सोमवारी शिक्षक देण्याचे आश्वासन असले तरी शिक्षक जो पर्यंत दिले जात नाही तोपर्यंत शाळा उघडली जाणार नाही असा पालकांचा पवित्रा असल्याचे लवंगी येथील एक पालक जयसिंग जाधव यांनी सांगितले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा