सोशल मिडियाच्या माध्यमातून ओळख आणि पुन्हा मैत्री झालेल्या तिघांच्या मदतीने मारुती ऊर्फ बाबा महादेव वाघमारे (रा. काटगाव, ता. तुळजापूर) याने विहिरींमधील विद्युत मोटारी चोरी केली. त्याला उमेश बाबासाहेब बोराडे, नागेश बापू कांबळे व मलकू मल्हारी गवळी (तिघेही रा. मार्डी, ता. उत्तर सोलापूर) यांनी साथ दिली. सुशीलकुमार अंकुश जाधव (रा. कासेगाव, ता. दक्षिण सोलापूर) यांच्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी सुरवातीला बाबाला अटक केली.
अटक केल्यानंतर त्याने सुरवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली, पण पोलिसी खाक्या दाखवताच त्याने चोरीची कबुली दिली. पोलिसांनी चौघांना जेरबंद करून चौकशी केली. त्यांच्याकडून पाच पाणबुडी मोटारी हस्तगत केल्या आहेत. ही कामगिरी पोलिस उपअधीक्षक अमोल भारती, सोलापूर तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक यांच्या नेतृत्वाखालील पोलिस नाईक शशिकांत कोळेकर, पैगंबर नदाफ, फिरोज बारगीर, महादेव सोलंकर, वैभव सूर्यवंशी व सायबर पोलिस ठाण्याचे धीरज काकडे यांच्या पथकाने पार पाडली. (TikTok star of Solapur district is the electric pump thief) टिकटॉक स्टार असलेलाच चोर असल्याचे समोर आल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत आणि आता विश्वास तरी कुणावर ठेवायचा असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा