जागर न्यूज : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला असतानाच हळू हळू कोरोना निर्बंधाचाही फास आवळला जाण्याची भीती व्यक्त होत आहे, त्यातच सातारा येथे मास्क सक्तीचा निर्णय लागू करण्यात आला आहे
संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेता राज्याची वाटचाल मास्कसक्तीच्या दिशेने सुरू असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. सातारा जिह्यात खबरदारीचा उपाय म्हणून मास्कसक्तीची अंमलबजावणी सुरू झाली आहे.त्यामुळे साताऱ्यात येणाऱ्या प्रत्येकाला मास्क असल्याशिवाय कुठेच प्रवेश दिला जाणार नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.सध्या राज्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. साताऱ्यात आतापर्यंत कोरोनाचे एकूण ५० सक्रीय रुग्ण आढळून आले असल्याने इथलं वातावरण चिंतेचं बनलेलं आहे. अशात दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर खरबरदारी म्हणून आता साताऱामध्ये मास्कसक्तीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यामुळे साताऱ्यात सार्वजनिक ठिकाणी पुन्हा एकदा मास्क बंधनकारक करण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी मास्कसक्तीचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार सर्व नागरिकांनी गर्दीच्या व सार्वजनिक ठिकाणी, आठवडी बाजार, एसटी स्टँड परिसर, प्रवास, मेळावे, लग्न समारंभ, मोठ्या संख्येने लोक जमतील अशा ठिकाणी मास्कचा वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसंच सामाजिक अंतर राखून वेळोवेळी सॅनिटायझरचा वापर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जयवंशी यांनी केले आहे. त्यामुळे शासनाने वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन करावे असे जिल्हाधिकाऱ्यांकडून कळविण्यात आले आहे.देशात कोरोना रुग्णवाढीचा उद्रेक झाला आहे. तर, महाराष्ट्रातही कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसतेय. महाराष्ट्रात कोरोनामुळे एकूण तीन जणांचा मृत्यू झाला आहे. आज २४८ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर आज दिवसभरात एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झालाय. राज्यातला मृत्यू दर १.८२ टक्के इतका आहे. राज्यभरात ३,५३२ कोरोनाचे सक्रीय रुग्ण आहेत. ३९५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाकडून योग्य दक्षता घेतली जात आहे.
कोरोनाचा नवीन व्हेरिएंट, लोकांची निष्काळजीपणा आणि हवामानातील बदल यामुळे कोरोना आणखी वाढत आहे. सध्या नवीन प्रकरणे वाढू शकतात, आता लोकांसाठी कोरोना प्रोटोकॉलचे पालन करणे खूप महत्वाचे झाले आहे. (Corona patients increased, forced to use masks, orders issued) निष्काळजीपणा धोकादायक ठरू शकतो.केवळ काळजी करीत बसण्यापेक्षा वेळीच काळजी घेणे केंव्हाही श्रेयस्कर ठरणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा