जागर न्यूज : सोलापूरचे राष्ट्रवादीचे नेते आणि माजी महापौर महेश कोठे यांच्या चिरंजीवाच्या हातातील "ती' तलवार नव्हती तर लाकडी दांडके होते असा निष्कर्ष आता पुढे आला असून या प्रकरणातील सगळी हवा निघून गेल्याचे दिसत आहे.
अवघ्या काही दिवसांपूर्वी हिंदू गर्जना मोर्चात हातात तलवार घेऊन हवेत फिरवल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते महेश कोठे यांचे चिरंजीव, माजी नगरसेवक प्रथमेश कोठे यांच्याविरूद्ध फौजदार चावडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती तर महेश कोठे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संबंध या घटनेने पुन्हा चर्चेत आले होते. पोलिसांनी मात्र या तलवारीच्या अनुषंगाने तपास केला, त्यावेळी व्हिडिओ व फोटोंच्या पडताळणीत ती वस्तू तलवार नव्हे; तर लाकडी दांडा होता, असा दावा पोलिसांच्या तपासणीत करण्यात आलेला आहे. सोलापुरात संघ परिवाराच्या वतीने लव्ह जिहाद, गोहत्या यासह विविध विषयांवर जोरदार शक्तिप्रदर्शन करीत ता. २६ मार्च रोजी हिंदू गर्जना मोर्चा काढण्यात आला होता. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते माजी महापौर महेश कोठे यांच्यासह त्यांचे चिरंजीव माजी नगरसेवक प्रथमेश कोठे हेही सहभागी झाले होते.
'त्या' मोर्चात प्रथमेश कोठे यांनी हातात तलवार घेऊन गर्दीत हवेत फिरविल्याने हा गुन्हा दाखल झाला होता. फौजदार चावडी पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक विनोद व्हटकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार प्रथमेश कोठेंविरूद्ध गुन्हा दाखल झाला होता. हिंदू गर्जना मोर्चामध्ये प्रथमेश कोठे सहभागी होऊन मोर्चा माणिक चौकात आल्यावर लाल वेष्टनात गुंडाळून आणलेली तलवार हातात बाळगली आणि मोर्चेकऱ्यांच्या गर्दीत हवेत फिरविली. यात पोलिस प्रशासनाने दिलेल्या कायदेशीर आदेशाचे उल्लंघन झाले होते. त्यानंतर पोलिसांनी या प्रकाराची फेरपडताळणी केली. त्यावेळी लाल वेष्टनात गुंडळालेली ती वस्तू तलवार नव्हती; तर लाकूड होते, असा दावा पोलिसांच्या तपासात करण्यात आलेला आहे.
फौजदार चावडी पोलिसांनी प्रथमेश कोठे यांच्यावरील गुन्ह्याची पडताळणी केली आहे. त्यांच्या हातात लाकूडच होते, हे स्पष्ट झाले आहे. तरीही, आणखी काही बाबी तपासल्या जात आहेत. (It was a wooden stick, not a sword, the police concluded) चौकशी पूर्ण झाल्यानंतर पुढील आठवड्यात त्यासंबंधीचा अहवाल न्यायालयात सादर केला जाणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा