जागर न्यूज : राज्य परिवहन महामंडळ पतीला रजा देत नाही म्हणून पत्नीने स्थानकातच ठिय्या दिला आणि या आगळ्या वेगळ्या आंदोलनाची राज्यभर चर्चा होऊ लागली आहे.
सेवा बजावताना रजा मिळत नसल्याच्या तक्रारी नेहमीच असतात, वरिष्ठांनी रजा मंजूर केली नाही तर कर्मचारी संताप व्यक्त करतात तर कधी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भांडतात. तक्रारीही करतात पण घरातील पत्नीला या रजा प्रकरणाशी काही देणे घेणे नसते. सांगलीत मात्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्याची पत्नी चर्चेत आली असून आपल्या पतीला रजा दिली जात नाही म्हणून या पत्नीने केलेले बंड हे भलतीच खळबळ उडवून देणारे ठरले आहे. या आधी असा प्रकार कधीही ऐकिवात नव्हता परंतु परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्याच्या पत्नीने आगाराचीच झोप उडवली आणि अखेर आपल्या पतीसाठी रजा मंजूर करून घेतली. तीने रजेचा रीतसर अर्ज देऊनही तो नाकारल्याने सांगलीच्या आटपाडी येथील एसटी कर्मचाऱ्याच्या पत्नीने आगारप्रमुखाच्या दालनासमोर झोपून आंदोलन सुरू केले.
या अनोख्या आंदोलनाची चर्चा आटपाडी परिसरात रंगली होती. दरम्यान एस टी च्या विभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी महिलेची भेट घेत आणि आज त्याच्या पतीला उपचारासाठी एक दिवसाची रजा दिली आहे. विलास कदम हे तेहतीस वर्षांपासून एसटीत चालक म्हणून सेवेत आहेत. ७० दिवसांनी ते सेवानिवृत्त होणार आहेत. त्यांची २७० दिवस रजा शिल्लक आहे. त्यांनी आजारी पत्नीला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी १२ आणि १३ मार्च अशा दोन दिवसांच्या रजेसाठी त्यांनी आगारप्रमुखांकडे ६ मार्च रोजी अर्ज केला होता. मात्र, सुटी नाकारल्याने पत्नी नलिनी यांनी आगारप्रमुखांच्या केबिनबाहेर अंथरुण टाकून आंदोलन सुरू केले होते. या अनोख्या आंदोलनाची सर्वत्र चर्चा रंगली होती.
दरम्यान, त्यांच्या या आगळ्या वेगळ्या आंदोलनाला अखेर यश आले असून एस टीच्या विभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी महिलेची भेट घेतली. तसेच आज त्याच्या पतीला उपचारासाठी एक दिवसाची रजाही दिली आहे. (State Transport: Wife protested for husband's leave) या आंदोलनाची सध्या सांगली जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे. या प्रकरणात आटपाडी पोलीस स्टेशनमध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा