जागर न्यूज : पंढरपूरसह सोलापूर जिल्ह्यात मोटार सायकलचोरी करणाऱ्या अट्टल चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून त्यांच्याकडून चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात पोलिसांना यश आहे आहे.
रात्रीच्यावेळी घरासमोरील लावलेल्या मोटार सायकली चोरल्याप्रकरणी अर्जून भारत पवार (वय २८, रा.कव्हे कुर्डूवाडी ता.माढा) व राहूल नारायण भोसले (वय २४, रा. धर्मगांव ता. मंगळवेढा) या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.त्यांचेकडून आतापर्यंत एकूण 12 मोटार सायकली जप्त करण्यात आल्या आहेत. पोसई शैलेश खेडकर व त्यांचे पथक हे टेंभूर्णी येथून निघून बातमी प्रमाणे शेटफळ येथील हाॅटेल नयन समोर येवून सापळा लावले असता काही वेळाने बातमीप्रमाणे 2 इसम विनानंबर प्लेटच्या मोटार सायकलसह सदर ठिकाणी आल्याचे दिसले, बातमी प्रमाणे त्यांचा संशय आल्याने त्यांना ताब्यात घेवून त्यांचे कब्जात मिळून आलेले मोटार सायकलचे कागदपत्रा बाबत चैकशी केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देवू लागले.
त्यांचेकडे कौशल्यपुर्ण विचारपूस करून तपास करता त्यांनी सांगितले की, आज सुमारे 10 दिवसापूर्वी 01 मोटार सायकल ही कुर्डूवाडी येथील बारलोणी येथून रात्रीच्या वेळी एका घरासमोरून चोरी केली असलेबाबत सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी मागील 2 ते 3 वर्षांपासून मंगळवेढा, अक्कलकोट, पंढरपूर, मोहोळ, परांडा उस्मानाबाद, चडचण कर्नाटका इत्यादी ठिकाणांवरून रात्रीच्यावेळी घरासमोरील लावलेल्या मोटार सायकली त्यांचे इतर साथीदार यांनी मिळून चोरल्याचे सांगितले आहे.त्यांचेकडून आतापर्यंत एकूण 12 मोटार सायकली जप्त करण्यात आल्या असून सोलापूर ग्रामीण जिल्हयातील एकूण 07 मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत इतर 5 मोटार सायकलीबाबत संबंधीत मोटार सायकल मालकांशी संपर्क करून माहिती घेण्याचे काम चालू आहे. तरी सदर आरोपीतांकडून 12 मोटार सायकलीसह एकूण 05 लाख 40 हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणून आरोपीस कामती पोलीस ठाणेचे ताब्यात देण्यात आले असून त्यांचेकडून आणखीन मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक शिरीश सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुहास जगताप, (Stolen motorbike seized from thieves) यांचे नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री. शैलेश खेडकर, स. फौ. ख्वाजा मुजावर, पोलीस अंमलदार नारायण गोलेकर, प्रकाश कारटकर, धनाजी गाडे, मोहन मनसावाले, अनिस शेख, धनराज गायकवाड, अक्षय दळवी, अक्षय डोंगरे चालक समीर शेख यांनी बजावली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा