जागर न्यूज : पेट्रोल पंप चालवायला देण्याच्या बहाण्याने पती पत्नींनी एकाला साठ लाखांचा गंडा घालून फसवणूक केल्याप्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समाजात हल्ली बेईमान लोकांची गर्दी वाढत असून संधी मिळेल तेथे गरजू लोकांची फसवणूक करण्यात येत असते. पैसा माणसाकडून काहीही करून घेवू लागला असून आता तर पेट्रोल पंप चालविण्यास देतो असे सांगत एकाला लाखो रुपयांना गंडा घातल्याची मोठी बाब समोर आली आहे मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर येथे धनश्री दत्तात्रय शिंदे रा. हिप्परगा, ता. दक्षिण सोलापूर यांनी इंडियन ऑइल कार्पोरेशन या कंपनीकडून 'प्रियंका पेट्रोलियम'या नावाने पेट्रोल पंप डीलरशिप मध्ये चालविण्यासाठी मंजूर करून घेतला आहे. परंतु सदरचा पंप धनश्री शिंदे व त्यांचे पती दत्तात्रय भारत शिंदे यांना त्यांच्या आर्थिक अडचणीमुळे चालविणे अशक्य झाले.दरम्यान, स्वप्निल सिद्धेश्वर मुत्तुर (रा. रवीदीप अपार्टमेंट, सोलापूर) यांचा मित्र प्रवीण प्रकाश टेळे यांना पंप विकायचा आहे, असे शिंदे पती-पत्नीने सांगितले.
शिंदे पती-पत्नीची स्वप्निल मुत्तुर यांच्याशी परिचय झाला. दरम्यान, स्वप्निल मुत्तुर व प्रवीण टेळे या दोघा मित्रानी पंप भागीदारीत चालविण्यासाठी घेण्याचे ठरले. ठरल्याप्रमाणे स्वप्नील मुत्तुर व प्रवीण टेळे यांनी तीन नोटरी करून दोघांनी निम्मे निम्मे मिळून पंधरा महिन्याच्या कालावधीत साठ लाख रुपये शिंदे पती- पत्नीला देऊन पंप चालविण्यास घेतला. दरम्यान श्रीमती शिंदे यांचे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सोलापूर शाखेची नोंदणी असल्याने पेट्रोल व डिझेलचा लोड मागविण्यासाठी श्रीमती शिंदे यांच्या बँक खात्यातून धनादेशाद्वारे कंपनीला रक्कम जाणे अनिवार्य होते. मात्र तसे झाले नाही.
वारंवार शिंदे पती-पत्नीकडे धनादेशाची मागणी करूनही त्यांनी सहकार्य न केल्याने मुत्तुर व टेळे यांना पंप चालविण्यासाठी अडचण निर्माण झाली. त्यांनी ठरल्याप्रमाणे पंप चालविण्यास दिला नाही (Cheating! Sixty lakh fraud in the name of petrol pump) मागणी करून ही साठ लाख रुपये परत न दिल्याने त्या दोघांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. या प्रकरणी स्वप्निल सिद्धेश्वर मुत्तुर यांनी मोहोळ पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून याची चर्चा मोहोळ तालुक्यात होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा