जागर न्यूज : सोलापूर जिल्ह्यातील अकरा सरकरी बाबुना नायब तहसीलदारपदी बढती मिळाली असून यात मंगळवेढा, माढा येथील समावेश आहे.
विभागातील पुणे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील अव्वल कारकून आणि मंडलाधिकाऱ्यांना नायब तहसीलदारपदी बढती देण्यात आली असून यात सोलापुरातील ११ अव्वल कारकून आणि तिघा मंडलाधिकाऱ्यांचा समावेश आहे.महसूल विभागातील अनेक पात्र कर्मचारी बढतीची वाट पहात होते.अव्वल कारकून जयश्री चन्नप्पा पंचे बीडकर यांना बदतीवर नायब तहसीलदार रोहयो, जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर) येथे तर, गजानन बेले यांना महसूल नायब तहसीलदार, सांगोला, सुधाकर यांना निवडणूक नायब तहसीलदार, उत्तर सोलापूर तर , संतोष आढारी यांना निवडणूक नायब तहसीलदार, भुदरगड, कोल्हापूर येथे पदोन्नतीवर नेमणूक देण्यात आली आहे. , प्रवीण सूळ (नायब तहसीलदार, संगायो, इंदापूर, पुणे), प्रकाश सगर (नायब तहसीलदार, प्रांत कार्यालय, मंगळवेढा), सुभाष कांबळे (नायब तहसीलदार, प्रांत कार्यालय माण, सातारा), चंद्रकांत हेडगिरे (निवासी नायब तहसीलदार, मंगळवेढा), प्रकाश मुसळे (महसूल नायब तहसीलदार, शिरूर, पुणे), संजय भंडारे (महसूल नायब तहसीलदार, अक्कलकोट), सुबोध विध्वंस (निवडणूक नायब तहसीलदार, मोहोळ) याप्रमाणे पदोन्नतीवरील नेमणुका देण्यात आल्या आहेत.
पदोन्नतीच्या या प्रक्रियेत मंडळ अधिकारी यांचीही नायब तहसीलदार या पदावर नेमणुका करण्यात आल्या असून नानासाहेब कोळी यांना निवासी नायब तहसीलदार, जत, सांगली येथे, बाबासाहेब गायकवाड यांना निवडणूक नायब तहसीलदार, राधानगरी, कोल्हापूर तर , पांडुरंग भडकवाड महसूल नायब तहसीलदार, माढा येथे पदोन्नतीवर नेमणूक देण्यात आली आहे. (Eleven Government Babu of Solapur District became Tehsildar) पदोन्नतीची बऱ्याच दिवसांपासून या कर्मचाऱ्यांना प्रतीक्षा लागलेली होती आणि पदोन्नती मिळाल्याने या कर्मचाऱ्यांत आनंदाचे वातावरण पसरले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा