जागर न्यूज : भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू पृथ्वी शॉ याच्यावर जोरदार हल्ला झाला असून त्याच्या कारवर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला चढवला असल्याची घटना घडली आहे. सेल्फी काढायला नकार दिल्याने ही घटना घडली.
क्रिकेटचा खेळ जगभरात सर्वांचा आवडता खेळ असून क्रिकेटपटूचे चाहतेही सगळीकडे असतात. या खेळाडू सोबत आपले फोटो असावेत अशी देखील अनेक क्रिकेट रसिकांची इच्छा असते. योग्य वेळी खेळाडू देखील फोटोला तयार असतात परंतु पृथ्वीने सेल्फी घेण्यास नकार दिल्याच्या कारणावरून आठ जणांनी मिळून बेसबॉल स्टिकने त्याच्या गाडीवर जोरदार हल्ला चढवला. क्रिकेटरसाठी जीव ओवाळून टाकायला क्रिकेट रसिक तयार असतात पण आज थेट भारतीय खेळाडूच्या गाडीवरच हल्ला चढवला असल्याची धक्कादायक बाब समोर आली असून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पृथ्वी शॉ आपल्या मित्राच्या कारमध्ये बसला होता. त्यावेळी तिथे काही जण पृथ्वी शॉ सोबत सेल्फी घेण्यासाठी आले. पण पृथ्वी शॉने नकार देताच त्यांनी रागाच्या भरात पृथ्वी शॉ बसलेल्या कारवर हल्ला केला. या प्रकरणी पृथ्वी शॉने ओशिवरा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सना गिल आणि शोभित ठाकूर या दोघांसह अन्य व्यक्तीनी कारवर हल्ला केला. ही घटना रात्रीच्या वेळेस मुंबईतील विलेपार्ले परिसरात घडली. पृथ्वी शॉने सेल्फी घेण्यास नकार दिल्यानंतर हा वाद झाला.
या प्रकरणी पोलिसांनी सना गिल, शोभित ठाकूर यांच्यासह इतर काही जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पृथ्वी आणि त्याचा मित्र एका रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेले होते. यादरम्यान पृथ्वी शॉचा चाहता आणि एक मुलगी त्याच्या टेबल आले आणि फोटो घेऊ लागले. काही फोटो घेतल्यानंतर चाहत्याने सतत व्हिडिओ आणि फोटो घेऊ लागला. त्यानंतर पृथ्वी शॉने त्याचा मित्र आणि हॉटेल मालकाला फोन करून फॅन्सना हटवण्यास सांगितले. रेस्टॉरंटच्या व्यवस्थापकाने त्या दोघांना बाहेर हाकलले. दरम्यान त्या दोघांसह काहीजण पृथ्वी शॉ आणि त्याचा मित्र रेस्टॉरंटमधून निघण्याची वाट पाहत राहिले होते.
दरम्यान शॉ आणि त्याचा मित्र बाहेर आल्यानंतर गाडीतून काही अंतरावर जाताना आरोपींनी कारला घेराव घातला. दरम्यान आरोपींन पृथ्वी शॉच्या मित्राच्या वाहनावर हल्ला करत काच फोडून मारामारी करू लागला. एवढेच नाही तर त्याने पृथ्वीच्या मित्राकडे ५० हजार रुपयांची मागणी केली. यादरम्यान पृथ्वी शॉला ताबडतोब दुसऱ्या वाहनातून पाठवण्यात आले. (Violent attack on Indian cricketer's car, case file against people) याबाबत पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे. ओशिवरा पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम १४३, १४८, १४९, ३८४, ४३७,५०४, ५०६ अन्वये पोलिसांनी सना गिल आणि शोभित ठाकूर यांच्यासह एकूण आठ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत आरोपींचा शोध सुरू आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा