सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील घेरडी येथील शाम पेट्रोलियम या पेट्रोल पंपावर मध्यरात्रीच्या नंतर आलेल्या चोरट्यांनी अचानक दहशत माजवली आणि पेट्रोल पंप कर्मचारी याच्या गळ्याला चाकू लावून २ लाख १६ हजार रुपयांची रक्कम लुटून नेली. चोऱ्यांचे प्रमाण सतत वाढत असले तरी पेट्रोल पंपावर होणाऱ्या घटना सोलापूर जिल्ह्यात कमी आहेत. बंद घरात शिरून चोरी होता होता आता सोलापूर जिल्ह्यात पेट्रोल पंप देखील चोरांचे लक्ष्य बनू लागले असल्याचे या घटनेने समोर आले आहे. (Thrill at the petrol pump, stolen money with a knife)लुटमार करण्याच्या उद्देशाने आलेल्या चार अज्ञात व्यक्तींनी काही वेळेतच पेट्रोल पंपावरील रक्कम लुटून नेली असून याबाबत पेट्रोल पंप कर्मचारी हर्षद गजानन सोनावणे यांनी पोलीसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सांगोला पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सांगोला तालुक्यातील घेरडी येथे शाम पेट्रोलियमफर्मचा एचपी पेट्रोल पंप आहे. दि. २० रोजी कामगार हर्षद सोनवणे व त्याचा सहकारी कामगार चैतन्य सरगर हे दोघे दिवसभराची विक्री रुपये २ लाख १६ हजार पंपाच्या ऑफिस लॉकरमध्ये ठेऊन ऑफिस मध्येच झोपले होते. दरम्यान दि. २१ रोजी पहाटे २ वाजता तोंडाला रुमाल, डोक्याला कानटोपी बांधलेले तीन इसम ऑफिस बाहेर येऊन हका मारू लागले. यावेळी फिर्यादी सोनवणे हा जागा झाला व त्याने तुम्हाला काय पाहिजे असे विचारले. यावेळी आलेल्या व्यक्तींनी पेट्रोलपाहिजे असे सांगताच फिर्यादीने ऑफीसचा दरवाजा उघडला फिर्यादी बाहेर येताच आलेल्या तिघा पैकी एकाने त्याच्या गळ्याला चाकू लावून पैशाची मागणी केली. यावर कामगाराने पैसे आमचे जवळ नसतात लॉकर मध्ये ठेवलेले असतात असे सांगितले. यावर तिघांनी मिळून फिर्यादीस गळ्याला चालू लावलेल्या अवस्थेत पुन्हा ऑफिस मध्ये आणले. यावेळी त्यांनी ऑफीस मध्ये झोपलेल्या दुसऱ्या कर्मचाऱ्यास उठविण्यास सांगितले. याचवेळी तीन चोरा पैकी एकाने बाजूस असलेले लॉकर चवीने उघडून त्यातील २ लाख १६ हजार रक्कम काढून घेतली.
चोरीची थरारक घटना घडत असताना एका चोरट्याने हर्षद सोनवणे याचे गळ्याला चाकू लावून धरलेला होता. त्यानंतर तिघांनी फिर्यादीच्या गळ्याचा चाकू तसाच ठेवून त्यांनी आणलेल्या स्कॉपिओ गाडी पर्यंत नेले. यावेळी गाडीमध्ये ड्रायव्हर सीट वरती एकजण अगोदरच बसला होता. गाडी जवळ येताच सोनवणे यास जोराने ढकलून दिले व सर्वजण गाडीत बसून घेरडी ते वाणी चिंचाळे रस्त्याने पळून गेले. कामगार सोनवणे व सरगर या कर्मचाऱ्यांनी घडलेल्या घटनेची माहिती पंपाचे मॅनेजर पंजाबराव साळुंखे यांना फोन करून सांगितली. त्यानंतर हर्षद सोनवणे याने सांगोला पोलिस स्टेशन येथे अज्ञात चार व्यक्तींनी चाकूचा धाक दाखवून २ लाख १६ गाजराची रक्कम लुटून नेली असल्याची फिर्याद दाखल केली आहे. पेट्रोल पंपावर झालेल्या या घटनेमुळे रस्त्यावरील अन्य पंपचालक देखील धास्तावले असून परिसरातील नागरिकातही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा