जागर न्यूज : एटीम कार्डाची बदलाबदली करून एका भामट्याने पंढरपूर तालुक्यातील एका वृद्धाची तब्बल ५७ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे.
बँकेतून रक्कम काढण्यासाठी एटीम ची चांगली सुविधा बँकांनी उपलब्ध करून दिली आहे परंतु अनेकांची आणि वेगवेगळ्या पद्धतीने मोठी फसवणूक केली जात असल्याचेही अनेक प्रकार घडताना दिसत आहेत. एटीमद्वारे रक्कम काढण्यासाठी गेल्यानंतर विविध बाबींची दक्षता घ्यावी लागते अन्यथा फसवणूक अटळ असते. यात अशिक्षित आणि वृद्ध व्यक्तींना लक्ष्य बनविण्याचे प्रकार अधिक घडत आहेत. पंढरपूर तालुक्यातील करकंब येथे अशाच प्रकारे एका वृद्धाची फसवणूक करण्यात आली असून हातचलाखी करीत त्यांच्या एटीम कार्डची अदलाबदली करण्यात आली आणि नंतर त्यांच्या खात्यातून तब्बल ५७ हजार ३०० रुपये काढून घेण्यात आले. या फसवणुकीचा गुन्हा करकंब पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
करकंबजवळच्या बार्डी येथील ६१ वर्षे वयाचे भाऊसाहेब शिवाजी कवडे यांची ही फसवणूक झाली आहे कवडे यांचे येथील बँक ऑफ इंडिया शाखेत सेव्हींग खाते असून त्यावरील 'एटीएम' कार्डने ते व्यवहार करतात. कवडे हे आपले नातू सार्थक सचिन कवडे याला घेऊन ते करकंब येथील भारतीय स्टेट बँकेच्या 'एटीएम' केंद्रात पैसे काढण्यासाठी गेले होते. मात्र, प्रयत्न करूनही त्यांना पैसे निघाले नाहीत. यादरम्यान, तेथे बाजुलाच थांबलेला एक अनोळखी व्यक्तीने चलाखीने कवडे यांच्या कार्डची आदलाबदली केली. नंतर कवडे यांनी दुसरीकडे सेवा केंद्रातून आधार कार्डवर ४ हजार रूपये काढले व नातूला घेऊन ते घरी परतले. त्यानंतर दुपारच्या वेळेस कवडे यांच्या मोबाईलवर १० हजार, ३ हजार, १५ हजार ३००, १५ हजार व १४ हजार अस ५ वेळा एकूण ५७ हजार ३०० रूपये बँक खात्यातून काढल्याचे संदेश प्राप्त झाले. त्यांनी खिशातून 'एटीएम' कार्ड काढून पाहिले असता ते दुसरेच रविंद्र एस. कुंभार नावाच्या व्यक्तीच्या नावाचे कार्ड असल्याचे दिसून आले.
करकंब येथील एटीम केंद्रात कार्डची अदलाबदल करून भामट्याने तेथून थेट टेंभुर्णी गाठले आणि या कार्डच्या माध्यमातून त्याने ही रक्कम काढून घेतली. फसवणूक करणारा अनोळखी व्यक्ती २५ ते ३० वर्षे वयाचा असून कवडे यांचे 'एटीएम' कार्ड हाती लागताच तो तात्काळ टेंभुर्णीला निघून गेला. तसेच काही वेळातच त्याने टेंभुर्णी येथील सुजित पेट्रोल पंप व श्री गणेश पेट्रोल पंप या ठिकाणच्या 'एटीएम' मशीनमधून पैसे काढले असल्याचे समोर आले आहे. (Cheating the elderly by changing the ATM card In Pandharpur taluka, )अशा घटना वारंवार घडत असून एटीम केंद्रात अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवणे धोक्याचे असून अशा प्रकारे फसवणूक होत असते याचा अनुभव पुन्हा एकदा या घटनेने दिला आहे त्यामुळे दक्षता घेणे आणि सावधगिरी बाळगणे हा एकमेव उपाय उरला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा