जागर न्यूज : तलाठी, मंडलाधिकारी यांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन मिळाले असून आजपासून तलाठी, सर्कल हे कामावर येत असून त्यांनी सात दिवसांपासून सुरु केलेले सामुहिक रजा आंदोलन मागे घेतले आहे. त्यामुळे आजपासून पुन्हा कार्यालये गजबजून जाणार आहेत.
विविध प्रकारच्या ११ मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य तलाठी संघाच्या वतीने ७ फेब्रुवारी रोजी सामूहिक रजा व कामबंद आंदोलन सुरू केले होते. याबाबत अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर समितीच्या सभागृहात बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला महाराष्ट्र राज्य तलाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार पांडेकर, पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा तालुकाध्यक्ष, उत्तर सोलापूरचे आले आहे. खजिनदार, पंढरपूरचे उपाध्यक्ष आदी पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत ११ मागण्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी चर्चेमध्ये पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. अपर जिल्हाधिकारी ठोंबरे यांनी प्राथमिक स्तरावर मेटा डेटाचे कामकाज जिल्ह्यातील तलाठी यांना तहसील कार्यालयातून रेकॉर्ड तपासणी करून प्रमाणपत्र देण्याबाबतचा तगादा लावला जातो. हे कामकाज तलाठी व मंडळ अधिकारी करणार नाहीत ही मागणी मान्य केली.
काम करण्यासाठी प्रिंटर व स्कॅनर मिळत नाही. शासनाच्या आदेशानुसार जिल्हांतर्गत तलाठयांच्या बदल्या करण्यात याव्यात. सब रजिस्टर कार्यालयामार्फत तलाठी कार्यालयाकडे येणाऱ्या चुकीच्या नोंदी रद्द करण्याची सुविधा मिळावी. ई-पीक पाणी करण्याबाबत सक्ती करू नये. ई-चावडी कामकाजाबाबत प्रशिक्षण देण्यात यावे. तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना नियमित वेतन मिळावे. तलाठी व कोतवाल यांची सेवा तहसीलदार अन प्रांत कार्यालयात वर्ग केली आहे. मूळ सजावरती आदेश देण्यात यावेत. अतिवृष्टी पंचनामा व अनुदान वाटपाचा मोबदला देण्यात यावा, या मागण्या टप्प्याटप्प्याने मान्य करू, असे आश्वासन देण्यात आले आहे.
पीएम किसान योजनेची कामे तलाठी करणार नाहीत, ते संबंधित कृषी विभागाकडे महिना अखेरपर्यंत सुपूर्द केले जाईल. २९ तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीमध्ये ९ जणांची पदोन्नती केली. (Talathi, Mandal Adhikari at work from today, movement back) त्रुटी पूर्ण झाल्यानंतर राहिलेल्या २० जणांच्या पदोन्नती केली जाईल, असे आश्वासन दिले. यावर तलाठी संघटनेने सकारात्मक प्रतिसाद दिला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा