जागर न्यूज : राज्यात महाविकास आघाडी मजबूत होत असतानाच सोलापुरात राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस यांच्यातील संघर्ष भलताच चिघळू लागला असून राष्टवादीच्या कार्यालयासमोर कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी आ. प्रणिती शिंदे यांचे पोष्टर झळकावत घोषणाबाजी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद उफाळल्याचे पाहायला मिळाले. एवढच नाही तर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंद कार्यालसमोर उभा राहून आमदार प्रणिती शिंदे यांचे पोस्टर झळकवत त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजीही केली. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आमदार प्रणिती शिंदे अंगार है बाकी सब भंगार है, प्रणितीताई आप आगे बढो हम तुम्हारे साथ है.. अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पोस्टर आंदोलनाला काँग्रेस पक्षाच्या युवक कार्यकर्त्यांकडून प्रत्युत्तर देण्यात आलं.
'सोलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांचा एकच उद्योग आहे, की वरिष्ठांना खूश करायचं आणि त्यांना कसं चांगलं वाटेल, यासाठी जमिनीवर काम न करता केवळ हवेत बाता मारायच्या. याचा एक निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचं जे बंद कार्यालय आहे तिथे आम्ही आंदोलन केलं. जे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सत्ता आणतो अशा वल्गना करत आहेत, त्यांनी अगोदर आपलं कार्यालय उघड आहे की नाही हे बघावे असे युवक कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष अंबादास कुरुंगळे यांनी म्हटले आहे. आज या बंद कार्यालयासमोर आम्ही आंदोलन केलं आहे आणि त्यांचे डोळे उघडण्याचा प्रयत्न केला. आमदार प्रणिती शिंदे यांचा जयघोष केला. ज्या स्वत:च्या संघर्षातून तीनवेळा निवडून आल्या आहेत. जनतेची काम करून, चोवीस तास जनतेत राहणाऱ्या आमदार म्हणून त्यांची ओळख आहे. भारतीय संस्कृतीची कुठलीही तमा न बाळगता काँग्रेस भवनासमोर ज्या पद्धतीने पोस्टर लावलं गेलं आहे. याचा मी निषेध व्यक्त करतो आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना इशार देऊ इच्छितो, काँग्रेस हा राष्ट्रवादीचा कायम मोठा भाऊ राहिलेला आहे. तुम्ही लहान भावाच्या भूमिकेत राहिला आहात. म्हणून आम्ही आतापर्यंत आम्ही खूप सहन केलं, सामंजस्याने वागलो. अगोदर तुम्ही मुद्य्यावर बोलत असाल तर आम्ही मुद्य्यावर येऊ, मात्र जर तुम्हाला मुद्य्याची भाष समजत नसेल तर आगामी काळात युवक काँग्रेस त्यांना गुद्य्याची भाषा सुद्धा शिकवल्याशिवाय राहणार नाही.'
'बेडकाचा बैल कधी होत नसतो, तो होण्याची सुद्धा तुम्ही कधी प्रयत्न करू नका. राष्ट्रवादी काँग्रेसने सोलापुरात सर्व जागा लढवल्या परंतु सोलापुरच्या जनतेने त्यांची केवळ चार नगरसेवकांवर बोळवण केली. म्हणून त्यांनी आपली ताकद पक्ष वाढवण्यावर खर्च करावी. केवळ आपल्या नेत्यांना खूश करण्यासाठी अशाप्रकारे स्टंटबाजीचा उपयोग करू नये, आम्हाला वेगळ्या पद्धतीने रस्त्यावर उतरायला लावू नका', असा इशारा देखील देण्यात आला आहे. काँग्रेस माजी नगरसेवक विनोद भोसले यांनी ही राष्टवादीवर आग पाखड केली आहे, "राष्ट्रवादी काँग्रेसचे जे पदाधिकारी होते, ज्यांनी काँग्रेस भवनासमोर येऊन गोंधळ घातला. बॅनरबाजी करून, शोबाजी करून गेले. त्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की आपण सोलापुर शहरातील आपलं कार्यालय अगोदर सुरू करा, नंतर शोबाजी करा. (Solapur Politics, Clash between Nationalist and Congress parties in Solapur) या नेत्यांना त्यांच्या घराच्या आजूबाजुलाही कोणी ओळखत नाही आणि ते काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात बोलतात. प्रणिती शिंदे अंगार आहे बाकी सब भंगार आहे. राष्ट्रवादी जिवंत आहे केवळ काँग्रेसमुळेच आणि काँग्रेस आमदारावरच तुम्ही टीका करतात. तुमची लायकी काय?"
'माझी रोहित पवारांना विनंती आहे, आपण जामखेड आणि कर्जतकडे लक्ष द्यावं. इथे सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे सक्षम आहेत. इथले काँग्रेस नेते, महाविकास आघाडीचे नेते सक्षम आहेत. असं असताना आपण आपल्यात भांडत बसू नका. सुशीलकुमार शिंदे, प्रणिती शिंदे यांच्या विचारांशी तुमचा विचार मिळाला तर आम्ही तुमच्या सोबत आहोत. नाहीतर आम्ही सर्वजण तुमच्याविरोधात जायला कधीही तयार आहोत. आम्ही लोकशाही पद्धतीने आंदोलन केलं आहे. आम्ही कोणाच्या विरोधात नाही, परंतु आमच्या नेत्या प्रणिती शिंदे अंगार आहेत बाकी सगळे भंगार आहेत."लोकसभेच्या सोलापूर जागेबाबत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केलेल्या विधानानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये सुप्त संघर्ष निर्माण झाला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा